हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा याच्या बायकोचा भाऊ अर्थात त्याचा मेहुणा जेसन वातकिन्सने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान तो ४८ वर्षाचा होता. या धक्कादायक घटनेनंतर रेमोची पत्नी लिजेल मोठ्या धक्क्यात आहे. भावाच्या आत्महत्येनंतर ती पूर्णपणे कोलमडून गेलीआहे. दरम्यान या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाय जेसनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी लिजेल यांची चौकशी केल्यानंतर तिने भावाने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. हे कारण फारच भावनिक करणारे आहे.
रेमो डिसूझा आणि पत्नी लिझेल यांच्यासाठी जेसनची आत्महत्या हा फार मोठा धक्का आहे. यांच्यासाठी २० जानेवारी हा दिवस फारच वाईट आणि वेदनादायी ठरला आहे. सध्या आपल्या भावाच्या आत्महत्येमुळे लिजेल धक्क्यात आहे. माध्यमांना सांगताना लिजेल म्हणाली, माझे वडील डायलेसिस रुग्ण आहेत. ते रुग्णालयात गेले होते. ते परत आल्यानंतर जेसनला शोधत होते. पण त्याच्या बेडरुममध्ये गेल्यावर तो मृत अवस्थेत होता. माझ्या आईचे २०१८ साली निधन झाले. तेव्हापासून जेसन डिप्रेशनमध्येच होता. आई गेल्याने तो कोलमडून गेला होता. आईसोबत त्याचे फार जवळचे नाते होते. आईसाठी त्याने लग्न देखील केले नाही. पण आई गेल्यानंतर बाबा आणि जेनस दोघेच राहत होते.
जेनसच्या अश्या पद्धतीने पाऊल उचलण्यामुळे लिजेल फार कष्टी आहे. त्याने आत्महत्या केली तेव्हा रेमो आणि लिजेल जवळच्या मित्राच्या लग्नासाठी गोव्यात गेले होते. दरम्यान लिजेलला तिच्या वडिलांचा फोन आला. फोनवर ते खूप शांत झाले. त्यांनी जेनस कुठे आहे असे लिजेलला विचारले. त्यांच्या अशा बोलण्यावरुन आधी रेमो आणि लिजेलला काही समजले नाही. मात्र त्यांनी त्यांना काही विचारण्याआधीच काळ लोटला होता आणि जेनस सगळ्यांपासून दूर झाला होता.
लिजेलने भावाच्या मृत्यूनंतर एल भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यात जेनसचा फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘का? तु माझी साथ कसा काय सोडू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही’. लिजेलने जेनस आणि तिच्या आईचा फोटो पोस्ट करत ‘आई मला माफ कर’, असे म्हटले आहे. सोबत जेनससह लहानपणीचा फोटोदेखील तिने शेअर केला आहे.
Discussion about this post