Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

संगीत रंगभूमी गाजवलेल्या स्वरसम्राज्ञी कीर्ती शिलेदार काळाच्या पडद्याआड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kirti Shiledar
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत रंगभूमी तब्बल सहा दशक गाजविलेल्या प्रसिद्ध गायिका कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झाले. त्यामुळे संपूर्ण संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्या ७० वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्ती शिलेदार यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यामुळे उपचारासाठी त्यांना शनिवारी सकाळी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारांचा काहीही फायदा झाला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीसचे उपचार सुरु होते. संगीत कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, संशय कल्लोळ, स्वयंवर, संगीत सौभद्र, मृच्छ कटिक, मंदोदरी, एकच प्याला या सारख्या संगीत नाटकांना कीर्ती शिलेदार यांनी आपला सूर दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by मुंबई बुलेट (@mumbai_bullet)

कीर्ती शिलेदार यांनी आपल्या वयाच्या दहाव्या वर्षीरंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले आणि यानंतर वयाची साठ वर्षे मराठी रंगभूमीची उपासना केली. इतकेच काय तर त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील भूषविले होते. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक- अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by 🎭मराठी संगीत नाटक🎭 (@marathi_sangeet_natak)

कीर्ती यांनी पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेची पदवी घेतली. यानंतर त्यांनी संगीत नाटिका केल्या. कीर्ती शिलेदार यांनी भूमिका केलेल्या नाटकांचे आजवर ४०००हून अधिक प्रयोग झाले आहेत. फक्त देशात नव्हे तर परदेशातही कीर्ती यांनी संगीत नाटिका पोहोचवली.

View this post on Instagram

A post shared by 🎭मराठी संगीत नाटक🎭 (@marathi_sangeet_natak)

आपण संगीत कान्होपात्रा ऐकले असेलच. यातील गाण्यांच्या गोडव्यामागे कीर्ती शिलेदार यांचे स्वर आहेत. गोड गळा, सुमधुर आवाज आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात अव्वल भूमिका साकारल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

View this post on Instagram

A post shared by 🎭मराठी संगीत नाटक🎭 (@marathi_sangeet_natak)

आजही ती गाणी मनामनात वसली आहेत. संगीत नाटक हे कीर्ती यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. यानंतर आपल्या आई, वडिलांनी जपलेला संगीत मराठी नाटकांचा वारसा आणि सन्मान जपताना कीर्ती शिलेदार यांनी प्रसिद्धी, पैसे बाजूला ठेवून केवळ रंगभूमीची उपासना केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात कीर्ती शिलेदार हे नाव
अजरामर राहील.

Tags: Kirti ShiledarManaapmanMusic TheatreSangit SaubhadraSenior Singer
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group