हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज एका अश्या अभिनेत्याचा वाढदिवस आहे ज्याचं कौतुक करावं तितकं थोडंच वाटत. असं आज प्रत्येक प्रेक्षक बोलताना दिसतोय. अलीकडेच बॉक्स ऑफिसवर दणदणीत गाजलेला चित्रपट ‘पुष्पा: द राईज’ याचे हिंदी डब करताना ज्याने पुष्पराज भूमिका साकारलेला अभिनेता अल्लू अर्जुनसाठी आवाज दिला.
View this post on Instagram
याशिवाय झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीमगाठ गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे. याची ख्याती काही वेगळीच आहे. आपल्या कलेच्या जोरावर त्याने इतके यश संपादन केले आहे कि त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये श्रेयसने अव्वल कामगिरी बजावली आहे. अश्या या सुपर से उपर नटाचा आज वाढदिवस आहे.
श्रेयसच्या जन्म २७ जानेवारी १९७६ साली झाला. आज श्रेयस ४६ वर्षाचा असला तरीही तो एकदम फिट आणि फाईन दिसतो. आजही अनेक तरुणी श्रेयसवर फिदा आहेत. श्रेयसचा जन्म हा मुळात मुंबईतलाच. त्यामुळे श्रेयस दिलसे एकदम मुंबईकर.
अंधेरी येथील श्री राम वेलफेर सोसायटी हायस्लकू या शाळेचा तो विद्यार्थी असून त्याने शाळेतही आल्या कलेचे उत्तरोत्तर दिवे लावले आहेत. अभिनयाची आवड श्रेयसने अशी जोपासली कि थेट इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आणि स्वबळावर नाव कमावले.
View this post on Instagram
आभाळ माया नावाची मालिका करताना श्रेयस दिप्ती नावाच्या युवतीच्या प्रेमात पडला आणि मिस दीप्ती मिसेस तळपदे झाल्या. त्या एक मनोचिकित्सक आहेत.
आजवरच्या कारकिर्दीत श्रेयसने एकापेक्षा एक हटके चित्रपट दिले आहेत. फक्त मराठी नव्हे तर अगदी बॉलिवूड देखील त्याने गाजवले आहे. मराठी इंडस्ट्रीतील त्याचा लक्षात राहिलेला चित्रपट म्हणजे पछाडलेला. यामध्ये त्याने भरत जाधव, अविनाश भडकमकर, दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, विजय चव्हाण, वंदना गुप्ते, मेघा घाडगे, पूर्णिमा अहिरे, नीलम शिर्के, अश्विनी कुलकर्णी अश्या तगड्या स्टारकास्टसोबत इंडस्ट्री हादरवली.
यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील त्याचा इकबाल हा चित्रपट फारच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ५.६ कोटींची कामे केली होती. यात श्रेयसने इक्बाल हि भूमिका केली होती. ज्याला ऐकता आणि बोलता येत नाही. पण त्याचे भारतीय क्रिकेट संघात खेळण्याचे स्वप्न असते. याशिवाय श्रेयसची गोलमालची सिरीज सुद्धा चांगलीच गाजली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे याला आतापर्यंत फेस आयकॉन, झी सिने अवार्ड, स्टार स्क्रीन अवॉर्ड यासह
२००५ साली इक्बालसाठी नामांकित फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार
२००६ साली झी सिने समीक्षकांचा पुरस्कार – इक्बालसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता
२००७ साली डोरसाठी स्टार स्क्रीन अवॉर्ड बेस्ट कॉमेडियन
२००८ साली ओम शांती ओमसाठी स्टारडस्ट ब्रेकथ्रू परफॉरमेंस अवॉर्ड (पुरुष)
२००८ साली ओम शांती ओमसाठी नामित फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळालेले आहेत.
Discussion about this post