हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील ओळखीचा चेहरा अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच काही ना काही विषयांमुळे चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. तर कधी पतीसोबतच्या वादांमुळे ती चर्चेत राहिली. पण यावेळी मात्र कहर झाला. तिने भोपाळमध्ये एका वेबसीरिजच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये असे काही वक्तव्य केले आहे कि ते ऐकून भल्याभयांचे डोळे खुले राहिले. या एका वक्तव्यामुळे ती सध्या चांगलीच वादात सापडली आहे. श्वेताच्या या विधानामुळे पत्रकार परिषद हादरलीच यानंतर आता सोशल मीडिया आणि सर्व स्तरांवर खळबळ माजली आहे.
Shweta Tiwari lands in controversy after her derogatory remark on God, MP minister orders probe
Read @ANI Story | https://t.co/7YjJunxrqR#ShwetaTiwari pic.twitter.com/loPfBWsDgj
— ANI Digital (@ani_digital) January 27, 2022
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने भोपाळमध्ये एका वेबसीरिजच्या प्रमोशनवेळी चालू पत्रकार परिषदेत आहे विधान केले आहे. तिने ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. तिने या पत्रकार परिषदेत म्हटले कि, माझ्या ब्रा’चे माप देव घेत आहे. तिच्या या विधानानंतर सर्व स्तरांवरून तिच्यावर टिकेचा भडीमार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे कडक आदेश दिले आहेत. श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी खरंतर भोपाळमध्ये गेली होती. पण तिथे ती वेब सीरिजच्या संपूर्ण टीमसोबत पत्रकार परिषद चालू असतानाच मजा मस्तीमध्ये असं काही बोलून गेली कि आता अडचणीत सापडली आहे.
Actress Shweta Tiwari made a controversial statement on God.. It happens in the press conference of #ShowStopper Webseries..#ShwetaTiwari @rohitroy500@DiganganaS #ControversialStatement #Trending #TrendingNow #ottplatform pic.twitter.com/EqmsibDoy4
— Deep Singh (@Deepsingh_page3) January 26, 2022
श्वेता तिवारीच्या या वक्तव्याचा विरोध करत मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘श्वेता तिवारीने आंतरवस्त्राबाबत केलेले विधान अतिशय निंदनीय असून तमाम हिंदू संघटनेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी श्वेता तिवारीची पुढील 24 तासात चौकशी करण्याचे निर्देश भोपाळ पोलीस कमिश्नर याना देण्यात आले असून लवकरात लवकर या चौकशीचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर या प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यास येईल’, असे ते म्हणाले. वर्क फ्रन्टबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री श्वेता तिवारीने हिंदीसह, भोजपुरी, पंजाबी, कन्नड आणि उर्दू भाषेतील चित्रपटात सुद्धा काम केले.
Discussion about this post