Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘या’ आहेत २०१९ मधील वर्षातील टॉप 10 वेबसिरीज…

tdadmin by tdadmin
December 26, 2019
in बातम्या, वेबसिरीज
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

चंदेरी दुनिया । गेल्या दोन वर्षांपासून वेब सिरीजची संकल्पना हिंदुस्थानी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागली आहे. त्यामुळे 2019 हे वर्ष वेबसिरीजसाठी चांगले ठरले. या वर्षी बऱ्याच चांगल्या वेबसिरीजही आल्या ज्यांनी प्रेक्षकांची मने जिकंली. चला तर पाहू अशा टॉप टेन वेबसिरीज…

10) लैला –

धर्म, जाती यावर आधारित लैला या वेबसिरीजचे कथानक भयंकर आहे. आर्यवत या समाजावर ही वेबसिरीज असून 2047 मध्ये संपूर्ण देशावर या समाजाचे राज्य असल्याचे दाखवले आहे. या वेबसिरीजमध्ये हुमा कुरेशी ही मुख्य भूमिकेत आहे.

9) सिटी ऑफ ड्रीम्स –

नागेश कुकुनूर या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, सचिन पिळगावकर, अरुण टिकेकर अशी मराठी स्टारकास्ट होती. राजकारण व त्यातून नात्यामध्ये येणारा दुरावा, पदासाठी कोणत्याही थऱाला जाण्याची असलेली तयारी या वेबसिरीजमध्ये दाखविण्यात आले आहे. या वेबसिरीजमधून पहिल्यांदाच प्रिया बापटने समलैंगिक स्त्रीची भूमिका केली असून यात तिने दुसऱ्या अभिनेत्रीसोबत किसींग सिन देखील दिला आहे.

8) बार्ड ऑफ ब्लड –

शाहरुख खानच्या रेड चिलीजची या निर्मितीगृहाची ही पहली वेबसिरीज आहे. शाहरुख खान ने स्वतं: या वेबसिरीजचे प्रमोशन केले होते. या वेबसिरीजची चर्चा बरीच झाली होती मात्र प्रेक्षकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या वेबसिरीजमध्ये इमरान हाश्मी, शोभिता धुलिपाला, कीर्ती कुल्हरी, विनीत कुमार सिंह, जयदीप अहलावात, दानिश हुसैन, रजित कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

7) क्रिमिनल जस्टिस –

हॉटस्टार च्या क्रिमिनल जस्टिस’ या वेब सीरीज मध्ये विक्रांत मस्से, अनुप्रिया गोएंका, पंकज त्रिपाठी, मीता वशिष्ठ आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. तिग्मांशु धूलिया, विशाल फूरिया यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. इंग्लंडमधल्या क्रिमिनल जस्टीस या मालिकेची ही वेबसिरीज ही रिमेक आहे.

6) कोटा फॅक्ट्री –

कोटा फॅक्ट्री ही वेबसिरीजमध्ये राजस्थानमधील कोटा या भागात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या वेबसिरीज मध्ये मयूर मोरे, जितेंद्र कुमार आणि दीपक सिमवाल यांची मुख्य भूमिका आहे. राघव सुब्बू यांनी या वेब सिरीज चे दिग्दर्शन केलेले आहे.

5) इनसाइड एज सीजन 2 –

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या प्रॉडक्शन हाऊसने म्हणजेच एक्सेल एंटरटेनमेंटने ही वेबसिरीज बनवली आहे.रिचा चड्ढा, विवेक ओबेरॉय, आमिर बशीर, तनुज वीरवानी, सिद्धांत चतुर्वेदी आणि अंगद बेदी यांची या वेबसिरीजमध्ये महत्वाची भूमिका आहे. या वेबसिरीजमध्ये क्रिकेटमध्ये बेटींग, भ्रष्टाचार कसा होतो हे दाखवण्यात आले आहे.

4) द फॅमिली मॅन –

प्राइम व्हिडीओची द फॅमिली मॅनही वेबसिरीज देशासह परदेशातही चांगली प्रसिद्ध झाली आहे. राज निदीमोरू आणि कृष्णा डीके यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केलेले आहे. या वेबसिरीजच्या पुढच्या भागाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. दुसरा सीझन केव्हा प्रदर्शित होणार हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.

3) मेड इन हेवेन –

अमेझॉन प्राइम व्हिडीओने ‘मेड इन हेवेन’ ही वेबसिरीज प्रसिद्ध केली होती. दिल्लीच्या तारा आणि करण नावाच्या दोन वेडींग प्लॅनर्सची यात गोष्ट दाखवण्यात आली आहे.तारा आणि करण लग्नाच्या तयारीसोबतच त्यांच्या आय़ुष्यातील अडचणी ते दोघे कसे दूर करतात हे या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेबसिरीज शोभिता धुलिपाला, अर्जुन माथुर, जिमी सरभ आणि कल्कि कोचलीन यांच्या मुख्य भूमिका आहेत. जोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव, नित्या मेहरा आणि प्रशांत नायर यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

2) दिल्ली क्राइम –

शेफाली शाह, राजेश तेलंग आणि रसिका दुग्गल यांची या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिका होत्या. रिची मेहता यांची ही वेब सीरीज संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारीत आहे. सात भागांच्या ही वेबसिरीज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली.

1) सेक्रेड गेम्स 2 –

2019 मध्ये नेटफ्लिक्सची ‘सेक्रेड गेम्स 2 ही वेब सीरीज सर्वात जास्त चर्चित वेबसिरीज मानली जाते. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागाबाबत संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. या वेबसिरीजचा दुसरा सीझन 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. दुसऱ्या भागात नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, रणवीर शोरे, कल्की कोएचलीन, सुरवीन चावला आणि जतिन सरना यांच्या मुख्य भूमिका आहेत.अनुराग कश्यप आणि नीरज घेवान यांनी या वेब सीरीज चे दिग्दर्शन केलेले आहे.

Tags: hindiweb seires
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group