हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदुस्थानी भाऊ याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील १० वी आणि १२ वीचे विद्यार्थी आक्रमक झाले. परिणामी या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. दरम्यान मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पाहता पाहता या आंदोलनाला हिंसक वळण आले. त्यामुळे अखेर हिंदुस्थानी भाऊला धारावी मुंबई पोलिसांनी अटक केली. यानंतर वांद्रे न्यायालयाने हिंदुस्थानी भाऊला ३ दिवसाची कोठडी सुनावली आहे. या सर्व प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक आक्रमक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
https://www.instagram.com/tv/CZYp7NlFtTN/?utm_source=ig_web_copy_link
विद्यार्थ्यांचे आंदोलन पाहून एकीकडे सरकारला घाम फुटला तर दुसरीकडे अख्ख राजकारण ढवळून निघालं आहे. आता यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी लिहिले आहे कि, “प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा “भडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे. त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी”, या ट्विटच्या माध्यमातून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रुपाली पाटील ठोंबरे यांनी हिंदुस्थानी भाऊंवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
प्रसिद्धीसाठी 'विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा "भडखाऊ भाईजान" कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे
तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी …@Dwalsepatil @AjitPawarSpeaks— Rupalipatilthombare (@Rupalispeak) January 31, 2022
दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असे सांगितले आहे. मात्र सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा ‘हिंदुस्थानी भाऊ’ने पसरवली होती असा त्याच्यावर आरोप आहे. शिवाय तो स्वतः एक युट्युबर असल्यामुळे त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. तसेच हिंदुस्थानी भाऊंची बोलण्याची शैली तरुणांना वेधून घेते. याचाच परिणाम म्हणजे काल राज्यभर विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. हिंदुस्थानी भाऊने आम्हाला बोलावले असून त्यांनीच आंदोलनासाठी निर्धार केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. परिणामी हिंदुस्थानी भाऊला अटक झाली आणि न्यायालयाकडून ३ दिवसाची कोठडी देखील मिळाली आहे.
Discussion about this post