हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्री गाजवणारे दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आपल्या अभिनयाइतकेच दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी हटके आणि वेगळं घेऊन येत असतात. त्यामुळे इंडस्ट्री असो किंवा सोशल मीडिया सगळीकडे मांजरेकरांनी हवा कायम असते. अलीकडेच त्यांचा ‘वरण भात लॉन्चा, कोन नाय कोन्चा’ हा धगधगत्या कथानकाचा चित्रपट तरुण प्रेक्षक वर्गाने उचलून धरला. तर दुसरीकडे सर्व स्तरांतून त्याच्या या कलाकृतीचा निषेध केला गेला. यानंतर आता विलक्षण प्रेमाची अनोखी कहाणी घेऊन मांजरेकर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. ‘पांघरूण’ हा मराठी चित्रपट येत्या ४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
अभिनेता, दिगदर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला ‘पांघरुण’ हा चित्रपट ४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपूर्ण राज्यांतील चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील कथानक अत्यंत विलक्षण आणि लक्षवेधी आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर हे कलाकार आहेत. ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ यासारख्या यशस्वी कलाकृतीनंतर आता ‘पांघरूण’ हा एक विशेष कलाकृती दर्शविणारा चित्रपट आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांना पांघरुणच्या माध्यमातून एक यशस्वी आणि विलक्षण प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे.
स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी ‘पांघरूण’ या मराठमोळ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यांनी हा संपूर्ण चित्रपट आणि त्याची कथा मंत्रमुग्ध झाली आहे. यातील प्रत्येक गाण्याने, त्याच्या संगीताने आणि बोलांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष ऊर्जा, आकर्षण आणि उत्सुकता निर्माण झाली होती.
Discussion about this post