हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशाचा आवाज, भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी ८.१२ वाजता निधन झाले. दरम्यान त्या ९३ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर आता लता दीदींचे पार्थिव ब्रीच कॅंडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे नेण्यात आले आहे. येथे दुपारी ३ वाजेपर्यंत अंत्य दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. याठिकाणी अनेक दिग्गज कलाकार मंडळी आणि नेते मंडळी उपस्थित आहेत.
लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे चाहते आणि अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत. हुंदके देणारे, टाहो फोनारे आवाज संपूर्ण वातावरण शोकमय झाल्याचे दर्शवित आहे. लता दीदींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, जावेद अख्तर, अनुपम खेर, सुभाष देसाई, बाळा नांदगावकर, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांसारखे दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. लता दीदी यांची काळजी घेणारे त्यांचे सहाय्यक अश्या प्रत्येकाच्या भरलेल्या उरातून केवळ लता दीदींच्या नसण्याचे दुःख ओझरतं आहे. लता दीदींचे निधन हि बाबा अक्षरशः हृदयद्रावक आहे.
लता दीदींच्या पार्थिवावर संध्याकाळी शिवाजी पार्क येथे ६ वाजून ३० मिनिटांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर सर्व राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. लता दीदींचे निधन हे देशाचे आणि संपूर्ण संगीत सृष्टीचे नुकसान आहे आणि लता दीदींचे स्वर अमर आहेत. यामुळे लता दीदी नेहमीच स्मरणात राहतील अश्या शोकसंवेदना अनेक दिग्गजांनी व्यक्त केल्या आहेत.
Discussion about this post