हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण जगभरात शोककळा पसरली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर लता दीदींचे पार्थिव ब्रीच कॅंडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे नेण्यात आले. यानंतर आता सर्व सामान्यांना दीदींचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी त्यांचे पार्थिव दादर येथील शिवाजी पार्क येथे ठेवले जाईल. यासाठी त्यांचे पार्थिव रवाना झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दीदींच्या चाहत्यांची गर्दी दिसत आहे. इतकेच नव्हे तर लता दीदी अमर रहे अश्या घोषणा देत आहेत.
View this post on Instagram
भारतरत्न लता मंगेशकर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून शिवाजी पार्ककडे रवाना झाले आहे. पॅडर रोडपासून पुढे ब्रिज कँडीहून त्यांचे पार्थिव दादरकडे निघाले आहे. पंतप्रधान मोदीही मुंबईला रवाना झाले आहेत. लतादिदींची अंत्ययात्रा त्यांच्या “प्रभुकुंज ” निवास येथून – महालक्ष्मी कॅडबरी जंक्शन– हाजी अली जंक्शन–हाजी अली– वरळी सी फेस रोड– वरळी अॅट्रिया मॉल, वरळी नाका– पोद्दार हॉस्पिटल–दूरदर्शन सिग्नल–वरळीकर चौक– सिद्धिविनायक मंदिर– इंदू मिल–चैत्यभूमी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज मैदान, अशी जाईल. दरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी या भागात लोक मोठ्या संख्येने जमत आहेत.
View this post on Instagram
लता दीदींच्या अंत्य संस्काराचे विधी मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी शासकीय इतमामात होतील. याठिकाणी सर्व सुविधा आणि तयारीची पाहणी स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी करून घेतली आहे. याठिकाणी अनेक दिग्गज कलाकार मंडळी आणि नेते मंडळी उपस्थित राहतील. दरम्यान त्यांना पोलीस आणि लष्करी सलामी देण्यात येईल आणि लता दीदींचा ब्रह्मलोकाचा प्रवास सुरु होईल.
Discussion about this post