हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाची चर्चा आहे. खरतर पहिल्या पोस्टरपासूनच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यानंतर आता येत्या २५ फेब्रुवारी २०२२ रोजी हा चित्रपट थिअटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र संजय लीला भन्साली यांचा इतिहास आहे कि वादाशिवाय चित्रपट रिलीज नाही. तसेच या चित्रपटाबाबत देखील झाले आहे. सध्या काँग्रेसच्या आमदारांनी या चिरत्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. शिवाय नाव न बदलल्यास कोर्टात जाऊ असा इशारा देखील दिला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे भन्सालींचा हा चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी या चित्रपटाच नाव बदल्याची मागणी केली आहे. तसेच यावर कोणताही तोडगा निघाला नाही तर शासनाकडे तक्रार दाखल करू. जरी शासन दरबारी आमचं म्हणणं मान्य केलं नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असे अमिन पटेल यांनी सांगितले.शिवाय चित्रपटाचे काठियावाडी हे नाव असल्याने शहराचं नाव खराब होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून त्या नावाला धक्का लागू नये यासाठी आम्ही नाव बदल करण्य़ाची मागणी करत आहोत असंही पटेल यांनी सांगितले आहे. कामाठीपुरा हा खूप मोठा परिसर आहे. त्यामुळे एका गल्लीमुळे तो संपुर्ण परिसर खराब आहे लोकांच्या मनावर बिंबवले जाईल. म्हणून आमची मागणी योग्य आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यावर योग्य तोडगा निघेल, असेही पटेल म्हणाले.
‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री अलिया भट्ट गंगुबाईची भूमिका साकारताना दिसतेय. मात्र उफाळलेल्या वादातून जर आमदार अमीन पटेल यांनी राज्य शासनाकडे हे प्रकरण नेलं तर मात्र हा चित्रपट रिलीज होण्याची शक्यता कमी होईल. अलीकडेच चित्रपत्रटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यावेळी सुध्दा अनेकांनी या चित्रपटाला विरोध केला होता. गंगुबाईच्या मुलानेसुध्दा याबाबत तक्रार दाखल केली होती. मात्र बॉम्बे हायकोर्टाने यावर स्थगिती दिली होती. या चित्रपटात गंगुबाईसाठी काही अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्यामुळे हि तक्रार केली होती. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून येत्या २५ फेब्रुवारीला रिलीज होणार असे जाहीर करण्यात आल्यामुळे चाहत्यांचा उत्साह प्रखर आहे पण वाद उफाळला तर निराशा होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच हा चित्रपट द माफिया क्वीन ऑफ मुंबई या कांदबरीबर आधारीत आहे.
Discussion about this post