Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाळेत गणवेशच घालायला हवा; कर्नाटकातील हिजाब वादावर हेमा मालिनी यांचे मोठे वक्तव्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Hema Malini
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कर्नाटक सध्या हिजाब प्रकरणावरून चालू असलेले वाद हे दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहेत. दर्म्य न्या वादावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात कुणी हिजाब घालण्याचे समर्थन करतंय तर कुणी गणवेशाचं समर्थन करताना दिसतंय. या सगळ्यात आता भाजप खासदार असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत शाळेत हिजाब घालण्याला विरोध केला आहे. शिवाय त्यांनी म्हटले कि शाळेत गणवेशच घालायला हवा. यामुळे कदाचित हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

On Karnataka hijab row, BJP MP Hema Malini says, "Schools are for education and religious matters should not be taken there. Every school has a uniform that should be respected. You can wear whatever you want outside the school." pic.twitter.com/06ZKueOzWn

— ANI (@ANI) February 9, 2022

भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी कर्नाटक राज्यात सुरु असलेल्या हिजाब वादावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यात हेमा मालिनी म्हणाल्या कि, शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश हा निश्चित ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने त्या गणवेशाचा सन्मान करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे. याबाबत तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा. अशा आशयाची प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली आहे.

Karnataka hijab row | I'll hold a meeting with Primary & Secondary Edu Minister BC Nagesh & officials along with State Home Minister to discuss briefly whatever happened. Will take a decision today evening on extending closure of all high schools & colleges: CM Basavaraj Bommai pic.twitter.com/3ieQVeG5AS

— ANI (@ANI) February 10, 2022

दरम्यान हिजाब मुद्द्यावरून कर्नाटक राज्यात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तीन दिवस राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवल्या आहेत. दरम्यान आम्ही सध्या कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाची वाट पाहात आहोत, मी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की, त्यांनी विनाकारण वाद घालू नये, शांतत ठेवावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.

त्याच झालं असं कि, जानेवारी महिन्यामध्ये कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला होता. येथील एका ज्युनिअर कॉलेजमधील ६ विद्यार्थिनींना त्यांनी हिजाब परिधान केल्यामुळे शिक्षण घेण्याकरिता वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. तर ड्रेसमध्ये समानता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले होते. यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा वाद वाढत गेला.

When Muslim girl arrives at PES College, She's been heckled by several 'students' wearing #saffronshawls #KarnatakaHijabRow pic.twitter.com/qa3UDbMPST

— Mohammed Zubair (@zoo_bear) February 8, 2022

हिजाबच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी भगवी शाल आणि भगवे फेटे परिधान करून शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचताना दिसू लागले आहेत. तर हिजाब परीधान केलेल्या युवतीला कॉलेजमध्ये पाहताच या तरुणांनी अतिशय आक्रमकरीत्या जय श्री राम अश्या घोषणा दिल्या. शिवाय त्या तरुणीने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत या जमावाला प्रत्युत्तर दिले. बघता बघता हा वाद इतका चिघळला आहे कि तो काही थांबण्याचे संकेतही दिसत नाहीत आहेत. आता अशावेळी सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Tags: BJP MPBollywood ActressCM Basavraj Bommaihema maliniHijab ControvercyKarnatak Hijab RowKarnataka CM
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group