हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील मढ दाना पानी येथे अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी अनेक वाहने, व्हॅनिटी व्हॅन रस्त्यावर उभी होती. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी आणि मालवणी पोलिसांनी चालू शूट थांबवून कारवाई केली आहे. रात्री उशिरा मालवणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शूटिंगसाठी आलेल्या वाहनांवर कारवाई केली. दरम्यान रस्त्यावर लावण्यात आलेली सर्व वाहने पोलिसांनी लॉक केली. यावेळी अक्षय कुमार उपस्थित नव्हता.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचे शुट मंगळवारी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री मुंबईतील मढ दाना पानी येथे सुरू होते. दरम्यान व्हॅनिटी व्हॅनसह इतर अनेक वाहने रस्त्यावर उभी होती. याबाबत तक्रार आल्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी मालवणी पोलिसांच्या सहाय्याने थेट कारवाई केली. सर्वात आधी रस्त्यावर लावलेली सर्व वाहनं हटवण्याबाबत पोलिसांनी सूचना केली. मात्र समोरून कोणतीही हालचाल नसल्याचे पाहून अखेर पोलिसांनी सर्व वाहने लॉक करीत कारवाईस सुरुवात केली.
याबाबत वाहतूक पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, मुंबईतील मढ दाना पानी या ठिकाणी एका चित्रपटाचे रात्री उशिरापर्यंत शूटिंग सुरु होते. दरम्यान सेटबाहेरील रस्त्यावर अनेक वाहने उभी होती. याबाबत आलेल्या तक्रारीनुसार आम्ही उभी केलेली वाहने आधी हटवण्यास सांगितलं होतं. पण त्यानंतरही ही वाहनं हटवण्यात आली नाहीत. त्यामुळे नियमांचे पालन न केल्यामुळे पार्क केलेल्या २० वाहनांवर दुहेरी कारवाई करण्यात आली आहे. अवैध पार्किंगची तक्रार ट्विट करून देण्यात आली होती. यानंतर वाहतूक पोलिस आणि मालवणी पोलिसांनी सेटवर जाऊन थेट कारवाई केली. दरम्यान पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी अक्षय कुमार तिथे नव्हता. त्याआधीच तो आपलं शूटिंग पूर्ण करून निघून गेला होता.
Discussion about this post