हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल राजकीय वर्तुळातील वातावरण काहीसे तापलेले दिसत आहे. सतत ईडीच्या कारवाईला सामोरे जाणारे नेते मंडळी इतके उद्रेकी झाले आहेत कि त्यांचं भाषाप्रेम आजकाल अगदी सहज शिव्यांमधूनही दिसून येत. शिव्या देण्यातही किती प्रगल्भता असते आणि प्रत्येक शब्दात किती गहन अर्थ दडला आहे हे सांगत आजकाल हि मंडळी सर्रास मीडियासमोर आणि जनतेसमोर शिव्या देताना दिसतात. आता काय बोलायचं आणि कस बोलायचं हा भाग व्यक्ती स्वातंत्र्याचा असलयामुळे जो तो ज्याच्या त्याच्या खाजगी आयुष्याचा भाग. याच्याविषयी बोलताना अभिनेता संदीप पाठक याने आपल्या खास शैलीत एक पोस्ट लिहिली आहे आणि आता ती पोस्ट चर्चेत आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिव्यांना महत्व प्राप्त झालंय ना??
सगळेच हळूहळू खालच्या थराला जात आहेत. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुणाला बरं मतदान करावं??🤔 छे बुवा कळतंच नाहीए.#maharastrapolitics #sandeeppathak #म #मराठी— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 21, 2022
मराठी अभिनेता संदीप पाठक हा एक अतिशय कमाल कॉमिक टायमिंग असलेला अभिनेता आहे. फारसा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसलेला संदीप चक्क राजकारणात शिव्यांना महत्व प्राप्त झालंय म्हणताना जेव्हा एखादी पोस्ट लिहितो तेव्हा ती चर्चेत न येणं हे नवलंच! त्यामुळे आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून संदीपने राजकीय मंडळींच्या वर्तणुकीवर केलेली हि पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या ट्विटमध्ये संदीप पाठकने लिहिले कि, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिव्यांना महत्व प्राप्त झालंय ना?? सगळेच हळूहळू खालच्या थराला जात आहेत. येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुणाला बरं मतदान करावं?? छे बुवा कळतंच नाहीए.
View this post on Instagram
संदीप पाठक हा एक अभिनेता आणि थिएटर निर्माता आहे. त्याचा जन्म १९७३ मध्ये माजलगाव येथे झाला. ‘रंगा पतंगा’ या मराठी चित्रपटातील आणि टीव्ही रिअॅलिटी शो ‘फू बाई फू’ यातील अव्वल कामगिरीसाठी तो ओळखला जातो. संदीपचे मराठी रंगभूमीवरील पहिले नाटक ‘वर्हाड निघाले लंडनला’ अत्यंत लोकप्रिय वग आहे. तर त्याचा पहिला चित्रपट ‘श्वास’ हा २००४ साली प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Discussion about this post