हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात गेली २ वर्ष अगदी कंटाळवाणी गेली. या दरम्यान मनोरंजनही संबंधित प्रत्येक गोष्टीवर मर्यादा आल्या होत्या. यामुळे सगळेच वैतागले होते. यानंतर आता जेव्हा मनोरंजनाची दार खुली झाली आहेत तेव्हा नवनवीन चित्रपट प्रदर्शित होऊ लागेल आहेत. यात आता इष्णव मीडिया यांची निर्मिती असलेला आणि संतोष मांजरेकर दिग्दर्शित ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह‘ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. लॉकडाऊनपूर्वी लग्न आणि लोकडाऊनमध्ये घरात लॉक झालेल्या एका नवविवाहित दांपत्याची हि गोष्ट आहे. दरम्यान या लग्न घरात नेमकं काय काय घडत ते पाहायचं असेल आणि धमाल करायची असेल तर हा चित्रपट जरूर पहा.
या चित्रपटाचे कथानक म्हणजे, एका जोडप्याचं लग्न होतं. पण त्याच काळात कोरोना महामारीचा संपूर्ण देशात शिरकाव होतो. परिणामी सरकार सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करत. मग या जोडप्याला एकांत मिळवण्यासाठी नाही नाही ती कसरत करावी लागते. त्यांना हवा असलेला एकांत मिळतो का?? आणि या लॉकडाऊनच्या काळात या घरात काय- काय गमतीजमती घडतात त्यांची एक सुरेख मांडणी या चित्रपटाच्या कथानकातून केली आहे. ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हा चित्रपट आज रिलीज झाला असून या आधीच त्याची गाणी ट्रेंड होत आहेत.
लकडाऊन या चित्रपटात तब्ब्ल १५ नावाजलेले चेहरे एकत्र दिसत आहेत. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटाचा सुवर्णकाळ जगलेल्या ‘शुभा खोटे’ यांची मुख्य भूमिका आहे. तर अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तसंच रूचिरा जाधव, समीर खांडेकर, स्नेहा रायकर यांच्यासह १५ तगडे कलाकार एकाचवेळी एकाच पडद्यावर बघायला मिळत आहेत.
या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटाची कार्यकारी निर्मिती स्मिता खरात यांनी सांभाळली आहे तर नृत्य फुलवा खामकर दिग्दर्शित आणि साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलय.
Discussion about this post