हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्मार्टफोनवर चित्रित झालेला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’ हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती अगदी महिनाभरात झालीय आहे. या चित्रपटात लांब लचक अथांग समुद्र, निसर्गाचे मोहविणारे सौंदर्य, कलरफुल फ्रेंच घरे आणि नात्यांमधील ऋणानुबंध अनुभवायला मिळत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक विशेष पर्वणी आहे. गुलाबजाम सारख्या दर्जेदार नात्याला बांधून कथा उठविणाऱ्या चित्रपटानंतर पॉंडीचेरीच्या माध्यमातून सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा एक नवा विषय मांडला आहे.
‘पाँडीचेरी’ या चित्रपटाची कथा काहीशी वेगळी पण आपलीशी वाटणारी आहे. या चित्रपटात साई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. चित्रपटाचे कथानक याच तिघांभोवती फिरताना दिसणार आहे. हा चित्रपट लव्ह ट्रॅन्गल थोडा वेगळ्या पद्धतीने मांडताना दिसणार आहे. त्यामुळे नात्याची आणि कुटुंबाची एक नवी व्याख्या प्रेक्षकांसमोर आली आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रण केले आहे.
चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना सई ताम्हणकर म्हणाली कि, ” यात मी अशी व्यक्तिरेखा साकारतेय जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहतेय. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोलले आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित केला आहे. मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.”
View this post on Instagram
तर भूमिकेविषयी बोलताना वैभव तत्ववादी म्हणाला कि, ”यात माझ्या व्यक्तिरेखेला अनेक छटा आहेत. ज्या चित्रपटातील प्रत्येक मूडला साजेशा आहेत. एक अशी कथा जी पॉंडीचेरी शहरावर आधारित आहे, याच गोष्टीने माझे पहिले लक्ष वेधून घेतले. आकर्षक फ्रेम्स, जबरदस्त दिग्दर्शन आणि संपूर्ण चित्रपटाचे चित्रण हे प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन आहे, जे त्यांना नक्कीच आवडेल.”
याशिवाय आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अमृता म्हणाली, ”मी अशी व्यक्तिरेखा साकारतेय, जिचे आयुष्य गुंतागुंतीचे होते आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करू पाहतेय. या भूमिकेसाठी हो म्हणायचे मुख्य कारण म्हणजे ही कथा मला भावली. हा चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित केला. त्यामुळे अनुभव वेगळा होता. कलाकारांसह केवळ 15 लोकांसोबत चित्रपटाचे चित्रीकरण झाले. मर्यादित क्रूसोबत काम करणे आव्हानात्मक होते. माझ्यासाठी छान अनुभव होता.”
Discussion about this post