हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगातील दोन देशांमध्ये सर्वात मोठे आणि प्रलयकारी युद्ध सुरु आहे. हे दोन देश म्हणजे रशीया आणि युक्रेन. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या दहा शहरांवरती सुरुवातीला हल्ला केला आणि हळूहळू युक्रेनच्या महत्वाच्या भागांवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युक्रेनमधल्या शहराचं मोठ नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युध्द घोषित केल्यापासुन युक्रेनमधील हवाई वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही एक लष्करी कारवाई असून यामुळे युक्रेनमधील कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले होते. हे युद्ध पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. यानंतर मराठी सिनेदिग्दर्शक विजू माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
मराठी सिने इंडस्ट्रीतील अत्यंत नावाजलेले दिग्दर्शक विजू माने यांनी आपल्या अधिकृत फेसबुक हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट शेअर करताना विजू माने यांनी एक फोटो शेअर केला आहे. यासोबत एक कॅप्शन लिहिले आहे. यामध्ये विजू माने यांनी लिहिले कि, ‘युध्द नकोच बुध्द हवा. मला चांगले ठाऊक आहे मी माझ्या फेसबुकच्या वॉलवर काही लिहिल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष युद्ध थांबवणार नाहीत. पण ‘युद्ध नको’ ही भावना माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवणे मला महत्त्वाचं वाटतं. आपण एखाद्याच्या आक्रमक विचाराच्या आहारी जाऊन कुठल्याही गोष्टीचं समर्थन करा, पण युद्धाचं कधीच नको. युद्धाने कधीच कोणी जिंकत नसतं.’
यानंतर हि पोस्ट चांगलीच व्हायरल होऊन चर्चेत आली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले कि, तुम्ही अगदी बरोबर बोलताय सर. हीच भूमिका योग्य आहे. तर अन्य एका नेटकऱ्याने लिहिले कि, सहमत! ही भूमिका जशी आजच्या जागतिक परिस्थितीला योग्य आहे तशीच ती आपल्या रोजच्या जगण्यात ही घेणं गरजेचं आहे.. युद्ध नको, बुद्ध हवा रोजच. याशिवाय अन्य एकाने लिहिले कि, खूपच सुंदर प्रत्येकाने असा विचार केला तरच चांगले परिवर्तन घडते. कदाचित हेच समजवण्यासाठी महाभारत होवून गेले…युद्धाने कुणीच विजय प्राप्त करु शकत नाही, असेही एकाने लिहिले आहे.
Discussion about this post