हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून सर्व मनोरंजनाच्या दरवाजांना कुलूप लागली होती. यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास येताच सरकारने कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणली. यामुळे प्रेक्षकवर्गात थोड्या प्रमाणात का होईना आनंद पाहायला मिळाला. दरम्यान राज्यातील थिएटर्स ५०% आसन क्षमतेने खुली करण्यात आली. यानंतर राज्यातून विविध कलाकार, प्रेक्षक आणि इतर प्रत्येक स्तरांतून थिएटर्स १००% क्षमतेने खुली करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. यासाठी मनसेने विविध जिल्ह्यात निवेदने देखील दिली आणि यानंतर अखेर आता राज्यातील थिएटर्स १००% क्षमतेने खुलली आहेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻 https://t.co/lKzjiVGeSk
— सोनाली (@meSonalee) March 2, 2022
राज्यातील थिएटर्स १००% क्षमतेने खुलली हि बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आहे. यानंतर विविध क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मनोरंजन हा असा विषय आहे जो सर्वांचा आवडता आहे. त्यामुळे आता मनोरंजनाची जत्रा १००% भरणार हे ऐकूनच अनेकांचा उत्साह वाढला आहे. याबाबत अनेक कलाकारांनी राज्य सरकारचे मनापासून आभार मानले आहेत. सोनाली कुलकर्णीने ट्विट करून राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर दिग्दर्शस्क विजू माने आणि अभिनेता कुशल बद्रिके यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन सरकारचे आभार मानले आहेत.
विजू माने यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये विजू माने स्वतः आणि सोबत कुशल बद्रिके दिसून येत आहे. यामध्ये विजू माने बोलताना दिसतात कि, एक अत्यन्त महत्वाची बातमी आली आहे आणि तीही जीआर च्या रूपात. ज्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानतो कि त्यांनी राज्यातील थिएटर्स १००% आसन क्षमतेने खुली केली. यासाठी मुख्यमंत्री महोदय, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण महाविकास आघाडीचे आम्ही आभार मानतो. तर कुशल बद्रिके म्हणाला कि, खरतर थँक्यू म्हणायला उशीर झाला पण खरंच थँक्यू.कारण या निर्णयाचा मराठी चित्रपटांना खरंच खूप फायदा होईल त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद!
Discussion about this post