Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हर हर महादेव! छत्रपतींच्या शिवगर्जनेसाठी राज ठाकरेंचा धीरगंभीर आवाज; एकदा टिझर पहाच

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Har Har Mahadev
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हर हर… महादेव! फक्त उच्चारायची कमी असते. कुणी नुसतं हरहर म्हटलं तरी मराठी मनातून एकच आवाज येतो आणि तो म्हणजे महादेव. हि गर्जना मराठी मनाला हात घालणारी, काळीज धडधडवणारी, अंगातील रक्त सळसळवणारी अशी शिवगर्जना आहे. अटकेपार भगवा फडकावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची मोहोर जिथे जिथे उमटली तिथे तिथे या गर्जनेने आसमंत दणाणला आहे. या गर्जनेशिवाय मराठ्यांचा इतिहास जणू अपूर्ण आहे. कारण प्रत्येक लढाईत ही गर्जना लढवैय्यांना उर्जा देत होती. हि ऊर्जा आता पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! कारण दिवाळीच्या मुहूर्तावर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट येणार आहे. याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला ज्यातील शिवगर्जनेसाठी राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे.

अभिजित देशपांडे लिखित- दिग्दर्शित, झी स्टुडिओज आणि गणेश मार्केटिंग फिल्म्स निर्मित ‘हर हर महादेवल या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला असून सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या धीरगंभीर आवाजाने चित्रपटाच्या टीझरची आणखीच चमक वाढवली आहे. “जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे.. हर हर महादेव,” अशी राज ठाकरेंच्या आवाजातील तडफदार घोषवाक्ये या टीझर फ्रेमच्या मागे ऐकू येत आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडिया दणाणून सोडला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी स्टुडीओजची निर्मिती असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याच्या टिझरसाठी राज ठाकरे यांनी आपला आवाज दिल्यामुळे इतिहासावर प्रेम करणारे, शिवरायांप्रती आदर बाळगणारे आणि मनसेशी जोडलेले अनेक प्रेक्षक अत्यंत उत्सुक झाले आहेत. आजवर झी स्टुडिओजने अनेक दर्जेदार कलाकृती सादर केल्या मात्र ‘हर हर महादेव’ ही कलाकृती अजरामर व्हावी अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Deshpande (@unbollywood)

त्यात आता राज्य सरकारने काही निवडक शहरांमध्ये चित्रपटगृहे १००% क्षमतेने सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रेक्षक आणखीच उत्साही झाले आहेत. म्हणजे लवकरच सर्वत्र चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ हा उद्घोष ऐकू येणार हे निश्चित आहे.

Tags: Abhijit DeshpandeHar Har MahadevHistorical Upcoming MovieRaj ThackreyTeaser ReleaseUpcoming Marathi MovieZee Studios
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group