हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी‘ या चित्रपटाची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित हा चित्रपट पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर आधारित आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाची निर्मिती फटमार फिल्म्स LLPच्या नेहा वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी केली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये २५० हून अधिक कलाकारांचा समावेश आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ हा चित्रपट पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर आधारित आहे. प्रसाद नामजोशी यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेते सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत. या कलाकारांसह दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके या कलाकारांच्यादेखील अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन तर गिरीश जांभळीकर यांनी छायांकनाची धुरा सांभाळली आहे. सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी या दोन्ही दिग्दर्शकांचे या पूर्वीचे चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले आहेत. त्यामुळे आता ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पुणे फिल्म फेस्टिव्हल नंतर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा असा दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांचा मानस आहे.
Discussion about this post