हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नामांकित लेखिका आणि ब्लॉगर म्हणून ओळख असलेल्या शेफाली वैद्य या नेहमीच विविध मुद्द्यांवर आपले मत अगदी स्पष्ट आणि परखड मांडताना दिसतात. मग ते कुणाला आवडो किंवा न आवडो. पण त्या लिहायच्या काही थांबत नाहीत. अशातच आता त्यांनी सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून झुंड चित्रपटावर निशाणा धरून एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. मात्र त्या आपल्या भूमिकेवर तटस्थ आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी एकामागे एक अश्या दोन पोस्ट केल्या आहेत ज्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी आपल्या भावना दुखावल्याचे म्हणत लेखिकेला प्रत्युत्तर दिले आहे.
नागराज मंजुळे आपल्या चित्रपटात तळागाळातील कलाकारांना एकत्र घेऊन प्रयोग करताना दिसतात. असाच प्रयोग यावेळी त्यांनी हिंदीमध्ये केला. समाजातील एखादा घटक ते समाजासमोर मांडताना त्या विषयाची मांडणी करताना नवख्या कलाकारांना संधी देताना दिसतात. मग हि कहाणी रुपेरी पडद्यावर दाखवताना मंजुळेंनी अमिताभ यांच्यासारख्या बड्या अभिनेत्याला का निवडले..? असा सवाल शेफाली वैद्य यांनी उपस्थित केला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शेफाली यांनी लिहिले कि, ‘इतका राग होता उच्चवर्णीय प्रस्थापितांवर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?’ यानंतर हि पोस्ट चांगलीच वादात दिसतेय. या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिले कि, ‘उच्चवर्णीय प्रस्थापित असा एक क्लब करू नका मॅडम ! सगळे प्रस्थापित उच्चवर्णीय नसतात, सगळे उच्चवर्णीय प्रस्थापितही नसतात. अमिताभच नाही, तर आमिर खान आणि धनुषही प्रस्थापितच आहेत. या लोकांना नागराजच्या कामाचे कौतुक करण्यात कमीपणा वाटत नाही आणि मराठीपुरते बोलायचे तर नागराज स्वतःच सगळ्यात मोठा प्रस्थापित आहे आज. त्याच्या नावावर सिनेमे चालतात.’ यानंतर आणखी एका युजरने लिहिले कि, सिनेमा बॉलीवूडचा हिंदी भाषिक आहे..आपण मराठी घरात सत्यनारायण घेतल्यासारखे विधान करू नये..नागराज मंजुळे तुमच्या डोक्यावर बसून तुमच्या परिघाच्या बाहेर कधीचाच निघाला त्याला तुमच्या सुचनेची तुमची घेत असलेल्या दखलेची काही देणंघेणं उरलेलं नाही, तेव्हा आपण आपली अमूल्य मत या देशातील ब्राम्हणहीत जपणेच्या कामी लावावे.
या एका पोस्टवर वाद चालू असताना अगदी काहीच वेळात शेफाली यांनी दुसरी पोस्ट शेअर केली आणि आगीला हवा देण्याचे काम केले. यात त्यांनी लिहिले की, ‘आग ऐसी लगाई की मजा आ गया! गाणं ऐकतेय मस्त आहे.’ यावरून युजर्सला आणखीच जोर आलाय आणि त्यांनी ट्रोलिंग करताना लिहिलं कि, आग लावणारे पाहिजे असतात बाई त्या शिवाय यश मिळत नाही कलाकारांना.
तर आणखी एकाने लिहिलं कि, आग आपल्याला लागली की, दुसऱ्याला स्पष्ट करावे.’ तर आणखी एका युजरने लिहिले कि, तुम्ही तुमचं जगणं जितकं सिरियसली जगला नसाल ना, त्यापेक्षाही कितीतरी जास्तं ‘झुंड’ सिनेमाला सिरियसली घेताय ! आणि हिच तर या सिनेमाची जादुय..!! #jhund ने आग ऐसी लगाई,मजा आ गया !! (गाणं संपलं). तूर्तास तरी हे शाब्दिक युद्ध संपायचे नाव घेईना.
Discussion about this post