टीम, हॅलो बॉलिवूड | आपल्यातील बहुतेक जणांना पॉप्युलर जॉनर ची सगळी गाणी आणि गायक माहिती असतात. पण काही जण वेगळ्या मार्गाने प्रवास करायचा ठरवतात. ‘इंडी फोक’ जॉनरची गाणी बनवणाऱ्या संगीतकार/गायक/गीतकार प्रतीक कुहाड याच्यासाठी २०१९ हे वर्ष अविस्मरणीय राहील. त्याचं कारण केवळ त्यांची गाणी प्रचंड हिट झाली हे नव्हे तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या एका गाण्याचे ‘कोल्ड/मेस’ चे त्यांच्या २०१९ च्या पसंतीच्या संगीत यादीमध्ये यादी केली.
वर्ष अखेरच्या निमित्ताने ओबामा यांनी ट्विटरवरुन त्यांच्या वर्षातील फेव्हरेट गाण्यांची व कलाकारांची नावे लिहिली. लिस्ट पोस्ट करतांना एक्स प्रेसिडेंट म्हणतात, “हिप-हॉप ते द बॉस पर्यंत माझी आवडती गाणी येथे आहेत. जर तुम्ही लॉन्ग ड्राईव्ह साठी किंवा जिम करताना ऐकण्यासाठी प्ले लिस्ट शोधत असाल तर, हि माझी आवडती गाणी तुमहाला नक्कीच आनंद देतील. लिस्टमध्ये बियॉन्से पासून ब्रूस स्प्रिंगस्टीनच्या हॅलो सनशाईन सारख्या मोठी आणि हिट गाणी आहेत.
“मला वाटत नाही की आज रात्री मला झोप लागेल, लिस्टमधील माझे नाव पाहून आनंद झाला, मी विश्वाचे आभार मानतो, याच्या सारखा मोठा सम्मान नाही !”, अशी प्रतिक्रिया प्रतीकने ट्विटरवर दिला.