Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तो’ ध्येयधुरंधर राजकारणी; चंद्रमुखी’तील दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Adinath Kothare
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही महिन्यांपूर्वी मराठी दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी घोषणा केलेला विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा टिझर रिलीज झाला होता. या घोषणेनंतर आणि टिझर व्हिडीओमुळे सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा रंगली होती. दरम्यान याची घोषणा करताना कॅप्शनमध्ये तो ध्येय धुरंधर राजकारणी…असे नमूद केल्यामुळे प्रेक्षकांना हा कोण असेल असा प्रश्न पडला होता. यानंतर काल उद्या दिसणार चंद्राच्या “दौलत”चा चेहरा…असे म्हणत एक ब्लर फोटो प्रसादने शेअर करून उत्सुकता आणखीच वाढवली होती. पुढे आज अखेर हा ध्येय धुरंदर राजकारणी आणि चंद्राचा दौलत कोण हे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

अखेर प्रेक्षकांच्या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा कोण साकारणार हे सर्वांसमोर आले आहे. महाराष्ट्रातील एक असा नेता जो समाजाच्या हितासाठी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असणारा, महाराष्ट्राची लोककला जपणारा, त्यांचे हक्क मिळवून देणारा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारा ‘दौलत देशमाने‘ आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार भूमिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार आहे. आदिनाथचा लूक आधीच्या कोणत्याही भूमिकेपेक्षा वेगळा आणि भावणारा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🅿🆁🅰🆂🅰🅳 🅾🅰🅺 : प्रसाद ओक (@oakprasad)

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना आदिनाथ कोठारे म्हणतो कि, ”निर्मिती, दिग्दर्शन, बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर आता बऱ्याच काळाने आपल्या भाषेत अभिनय करत आहे आणि त्यातही इतकी दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, त्यामुळे यापेक्षा वेगळा आनंद कोणता असूच शकत नाही. भूमिकेबद्दल सांगायचे तर यापूर्वीही मी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र ही भूमिका खूप वेगळी आहे. एक असा राजकारणी ज्याची आयुष्यात काही ध्येय आहेत. तो समाजकल्याणासाठी, हक्कांसाठी लढत, धडपडत आहे. त्याच्या या धडपडीला यश मिळेल का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. ”

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

तर दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात कि, ”यापूर्वी मी आदिनाथचे काम पाहिले आहे. त्यामुळे दौलतच्या व्यक्तिरेखेत तो चपखल बसला. त्याने त्याच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. टिझरमध्येच आपल्याला दौलतच्या व्यक्तिरेखेचा अंदाज आला आहे. त्यामुळे पडद्यावर दौलत काय करणार आहे, हे प्रेक्षकांना कळेलच. आता ‘चंद्रमुखी’ समोर यायची आहे. तीही लवकरच आपल्या भेटीला येईल.” अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत आणि संगीत अजय – अतुल यांनी दिले आहे.

Tags: Aadinath KothareChandramukhiInstagram PostMarathi upcoming moviePrasad Oak
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group