हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लज्जतदार आणि चमचमीत कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’मध्ये यावेळी राजकीय खिचडी शिजणार आहे. असं बोलायचं कारण म्हणजे यावेळी किचन कल्लाकार या कार्यक्रमात हि राजकीय खिचडी शिजवण्यासाठी दोन खास राजकारणाशी संबंधित पाहुणे येणार आहेत. नुकताच समोर आलेल्या प्रोमोनुसार, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. राजेश टोपे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
सध्या ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाचा नवा भाग ‘मसालेदार किचन कल्लाकार’ सुरु झाला आहे. आता आधीप्रमाणे या कार्यक्रमाच्या भागातही विविध पाहुणे येणार आहेत. यात विविध क्षेत्रातील लोक येणार यात काही वादच नाही. पण यावेळी ज्या पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे ते मात्र काय शिजवणार असा प्रश्न पडला तर कुणीही सहज सांगेल कि राजकीय खिचडी. कारण यावेळी किचन कल्लाकारमध्ये राजकीय वातावरणाचा घमघमाट सुटणार आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. राजेश टोपे आणि खासदार सुजय विखे पाटील हे यावेळी खूप गप्पा मज्जा करत विविध पदार्थ बनविताना दिसणार आहेत.
झी मराठीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ‘मसालेदार किचन कल्लाकार’ या नव्या भागाचा एक कमाल नवा प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. राजेश टोपे तसेच भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. हे दोन्ही पाहुणे राजकीय वातावरणातून थेट स्वयंपाक घरात शिरले आहेत खरं. पण काय बनवतील आणि काय बोलतील याचा कोण काय अंदाज लावणार.? म्हणूनच हे दोन्ही राजकीय पाहुणे या किचनमध्ये कोणता पदार्थ बनवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Discussion about this post