हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकतर हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. याचे कथानक काश्मिरी पंडितांच्या काश्मीर येथून झालेल्या स्थलांतराच्या घटनेचे भाष्य करतो. त्या वेदना, तो त्रास, ते अश्रू आणि काश्मिरी पंडितांनी जगलेले ते दिवस या चित्रपटातून एक भयावह सत्य समोर आणलं गेलं आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देणारे दोन गट पडले आहेत. यात राजकीय पक्षांमधील वातावरण देखील कधी नरम कधी गरम झाल्याचे दिसत आहे. पंतप्रधानांनी चित्रपटाचे कौतुक केल्यापासून राजकीय वारे भलतेच वाहू लागले आहेत. आता शिवसेनेचे खासदार समजत राऊत यांनी बिजेपीवर आरोप लावला आहे.
शिवसेनेचा वाघ अशी ओळख असलेले खासदार संजर राऊत जे मुंबईत माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा गरजले आहेत. याहीवेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधण्याचा योग बरोबर साधला. ते म्हणाले, काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून काय झाले आहे ते आम्ही जवळून पाहिले आहे. त्यावर चित्रपट तयार करण्यात आला असून त्याचा राजकीय फायद्यासाठी लोक प्रयत्न करतील पण तो होणार नाही. पण त्यामध्ये सत्य लपवण्यात आले आहे आणि ते चित्रपटामध्ये यायला हवे होते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच ‘द कश्मीर फाइल्स’चा भाजपा आणि पंतप्रधान प्रचार करत आहे. भाजपाचे समर्थक हा चित्रपट पाहणारच आहेत,”असेसुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत.
Discussion about this post