हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित होऊन साधारण दुसरा आठवडा संपत आला आहे. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही दणक्यात कमावतोय. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपटदेखील थिएटरमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे साहजिकच आता हा चित्रपट थिएटरमध्ये लावला जाईल. मात्र त्याच्या शोदरम्यान ओडिशामध्ये काही लोकांकडून थिएटरमध्ये नुसता धुमाकूळ घातला आह. ‘TOI’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ‘बच्चन पांडे’चा शो सुरू असताना भगवा स्कार्फ घातलेल्या काही लोकांनी थिएटरमध्ये प्रवेश करीत थिएटर क्रू आणि मालकाला धमक्या देत शो मध्येच थांबवला. याचे कारण म्हणजे काश्मीर फाईल्स लावा अशी त्यांची मागणी होती.
अक्षयचा ‘बच्चन पांडे’ थिएटरमध्ये सुरु असताना त्याचा शो थांबवत या जमावाने ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या शोची मागणी केली. याआधीही अशा प्रकारची घटना घडल्याची तक्रार संबंधित थिएटर मालकाने केली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधी १० तर कधी अगदी १०० लोकांचा जमाव थिएटरच्या परिसरात दाखल होतो आणि अशाप्रकारचा गोंधळ घालताना दिसतो.
दरम्यान अशाच एका जमावाने ‘द काश्मीर फाईल्स’चा शो सुरू असताना एक सीन काढून टाकल्याचा आरोप केला होता आणि खूप गोंधळ घातला होता असे मालकाने सांगितले. पुढे म्हणाला, “थिएटरचा मॅनेजर कोणत्याही चित्रपटातून एखादा सीन कसा काय काढू शकतो?” तुम्हीच सांगा.आतापर्यंत अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाने ३४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ने भारतात गेल्या १२ दिवसांत १८० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Discussion about this post