हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मिथिला पालकरच्या आजोबांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी २६ मार्च २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला. मिथिला तिच्या आजोबांची लाडकी होती. शिवाय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या स्थानी तिचे आजोबा होते. गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या आज्जी आजोबांसोबतच राहत होती. त्यामुळे अशा कुणाहीपेक्षा जवळ व्यक्तीचे निधन पचविणे सोप्पी गोष्ट नसते. यामुळे आजोबांच्या निधनानंतर मिथिला अक्षरशः कोलमडली आहे. तिने इंस्टाग्रामवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आपल्या आजोबांसोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि तिच्या कलाकार मित्रमैत्रिणींनी आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मिथिलाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘09.02.1928 – 26.03.2022. माझ्या विश्वाचा केंद्रबिंदू आणि मला सर्वाधिक प्रोत्साहन देणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वी आम्हाला सोडून गेले. त्यांच्याशिवाय मला आयुष्य म्हणजे काय माहित नाही आणि कदाचित ते कधीच कळणार नाही. एक गोष्ट मला माहित आहे, ते म्हणजे ते खरे लढवय्ये होते. आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे होते. त्यांची हीच गोष्ट आम्ही आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करू. ते माझ्यासाठी खूप खास होते आणि नेहमीच माझे नंबर 1 राहतील. जिथे असाल तिथे छान रहा भाऊ. तुमच्या आनंदी हास्याने स्वर्ग आता अधिक आनंदी होईल.’ मिथिलाच्या या पोस्टवर सुप्रिया पिळगावकर, श्रिया पिळगावकर, अमृता खानविलकर, सायली संजीव यांसारख्या कलाकारांनी कमेंट्सच्या माध्यमातून आजोबाना श्रद्धांजली देत तिचे तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.
अभिनेत्री मिथिला पालकर हि तिच्या आजी – आजोबांसोबत दादरला राहत होती. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिच्या आजोबांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली होती. तेव्हासुद्धा मिथिलाने तिच्या भाऊंसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. ‘भाऊंना भरलेलं घर खूप आवडतं. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली असली तरी ते सर्वांना पाहून स्मितहास्य करत आणि सर्वांशी गप्पा मारत. कोरोनावर मात केल्यानंतर ते मला हसत म्हणाले होते, की मी किमान शंभरी तरी गाठणार. तुला सोडून इतक्या लवकर कुठेच जाणार नाही’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. मात्र भाऊंची शंभरी दैवाला मान्य नव्हती बहुतेक. त्यामुळे आज भाऊंनी जगाचा निरोप घेतला मात्र मिथिलाच्या आयुष्यातील त्यांची जागा त्यांच्याशिवाय इतर कुणासाठीच नसेल हे नक्की.
Discussion about this post