चंदेरी दुनिया । सध्या डिजिटायझेशनचं युग असून 2019मध्ये प्रेक्षकांना एकापेक्षा एक अशा दमदार वेबसीरिजची मेजवानी मिळाली होती. आता नव्या वर्षांत आपण लवकरच पदार्पण करणार असून नव्या वर्षातही एकापेक्षा एक दमदार वेबसीरिज रसिकांना पहायला मिळणार आहेत. जाणून घेऊयात कोणत्या वेबसीरिज आहेत
इंजिनिअरिंग गर्ल्स सीझन 2
टीव्हीएफवर प्रसारीत होणारी इंजिनिअरिंग गर्ल्स या सीरिजच्या पहिल्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच दाखल होणार आहे. आता दुसऱ्या सीझनमध्ये मग्गु, सबु व कियारा यांची मैत्री आणखीन एक पाऊल पुढे जाताना दिसणार आहे. कॉलेजमधील अनुभव, इंजिनिअरिंगच्या दिवसांतील अविस्मरणीय आठवणी व कटू प्रसंग आणि कॅम्पस प्लेसमेंट अशा सगळ्या गोष्टी दुसऱ्या भागात अनुभवायला मिळतील. यात सेजल कुमार, क्रितिका अवस्थी व बरखा सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
मिस्टर अँड मिसेस सीझन 3
मिस्टर अँड मिसेस सीझन 3मध्ये वयाच्या तीशीतील एका जोडप्याची कथा पहायला मिळणार आहे. त्यात अचानक आयुष्यात येणारं नवीन प्रेम व प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हे या सीरिजमध्ये पहाता येईल. ही सीरिजदेखील टीव्हीएफवर पहायला मिळेल. याच बिस्वपती सरकार व निधी बिष्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
द गर्ल्स
द गर्ल्स ही वेबसीरिज टीव्हीएफवर दाखल होणार आहे. यात तीन पॅशनेट मुलींची कथा रेखाटण्यात आली आहे. त्यांची नावं आहेत विविकी, लिली व अॅना. त्यांच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे प्रसंग यात दाखवण्यात येणार आहेत. या सीरिजमध्ये अहसास चन्नास रश्मी अगडेकर व रेवती पिल्ले हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
कोड एम
कोड एम ही सीरिज ऑल्ट बालाजीची असून यात भारतीय लष्कराच्या वकीलाची कथा पहायला मिळणार आहे. या वकीलाचे नाव मोनिका मेहरा असून ही भूमिका जेनिफर विंगेट साकारणार आहे. यात ती अतिरेकी चकमकीदरम्यानच्या खुल्या व बंद झालेल्या प्रकरण इन्व्हेस्टिगेट करून सत्य समोर आणणार आहे. या सीरिजमध्ये जेनिफरशिवाय रजत कपूर व तनुज विरवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
मेंटलहूड
मेंटलहूड या सीरजमधून करिश्मा कपूर डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. ही सीरिज बालाजी ऑल्टची आहे. या सीरिजमध्ये वेगवेगळ्या आईंचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. जे आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी अवास्तव अपेक्षांमधून मार्ग काढत असतात. मल्टी टास्किंग राहण्याची त्यांना सवय आहे. नेहमी चिंता व पश्चाताप करण्याची फिलिंग त्यांचा स्वभाव बनून जातो. या सीरिजमध्ये करिश्मा कपूर सोबत संजय सूरी, श्रृष्ठी सेठ, डिनो मोरिया, संध्या मृदूल, शिल्पा शुक्ला व तिलोतमा शोम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
गंदी बात सीझन 4
दी बात या ऑल्ट बालाजीच्या सीरिजमध्ये काही सत्य घटना दाखवण्यात आल्या. या सीरिजला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर आता या सीरिजचा चौथा सीझन दाखल होत आहे.
इट हॅपेन्ड इन कोलकाता
इट हॅपेन्ड इन कोलकाता सीरिजची कथा एका तरूण मुलगी कुसूमभोवती फिरते. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न असते आणि कोलकाता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळून तिचे स्वप्न साकार होणार असते. ती कॉलेजमधील रोनोबीरच्या प्रेमात पडते. यात करण कुंद्रा व नगमा रिझवान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दिल ही तो है सीझन 3
ऑल्ट बालाजीच्या दिल ही तो है या वेबसीरिजच्या पहिल्या दोन सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या सीरिजचा तिसरा सीझन दाखल होत आहे. यात करण कुंद्रा व योगिता बिहानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
डॅमेज्ड 2
हंगामा प्लॅटफॉर्मवरील डॅमेज्ड 2 ही सायकोलॉजिकल क्राईम ड्रामा सीरिज आहे. यात हिना खान गौरी बत्राच्या भूमिकेत दिसणार आहे.