हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीची मोठी परंपरा आहे. मात्र या स्पर्धेत आत्तापर्यंत फक्त पुरुषांनीच सहभाग घेतला असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करावी अशी मागणी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. यासाठी दीपाली सय्यद यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. तसेच त्यांना अधिकृत पत्र पाठवून महिलांसाठी कुस्ती स्पर्धा भरवण्याची विनंती केली आहे.
View this post on Instagram
आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे मार्फत विविध राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा घेतल्या जातात, परंतु पुरूष महाराष्ट्र केसरी प्रमाणे स्वतंत्र महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत नाही याची खंत आहे. असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्राला पुरुष महाराष्ट्र केसरी विचारले तर जगजाहीर आहे. तसेच जर महिला महाराष्ट्र केसरी कोण ? तरी अद्याप माहीती नाही. आदरणीय साहेब आपणांस विनंती आहे कि, पुरुष महाराष्ट्र केसरी प्रमाणे स्वतंत्रपणे महिला महाराष्ट्र केसरीची नविन ओळख महिला कुस्तिगीरांना मिळावी.
पुढे, हाच एकमेव उद्देश साध्य व्हावा याचसाठी हे प्रयोजन आदरणीय पवार साहेब आपण या विषयात मार्गदर्शन करून महिला कुस्तीगीरांना नविन ओळख तुमच्या आशिर्वादाने द्यावी. हिच माझी नम्र विनंती! असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे. दरम्यान, आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगत आहे. तब्बल ५९ वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी ९०० पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत.
Discussion about this post