हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सागरिका म्युझिक यांनी २० वर्षांपूर्वी अभिनेता सचिन पिळगावकर यांनी गायलेल्या गाण्यांचा एक अल्बम प्रदर्शित केला होता. या अल्बमचे नाव ‘सचिनमय‘ असे होते. या अल्बममध्ये वसंत बापट, दादा कोंडके, गो. नि. दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांचा समावेश होता. या गाण्यांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं. याच अल्बम मधीलच गो. नि. दांडेकर लिखित ‘धनगर राजा’ हे गाणं आता पुन्हा एकदा एका वेगळ्या ढंगात आणि वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आल आहे. हे गाणं आता ॲनिमेटेड व्हिडिओ स्वरूपात प्रेक्षकांसाठी सागरिका म्युझिकने आणलं आहे.
‘धनगर राजा’ हे ऑडिओ आणि ऍनिमेटेड व्हिडीओ गाणं सागरिका म्युझिकच्या मराठी युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार अश्या सुरेल आवाजात धनगर राजा हे गाणं गायलं आहे. हे गाणं म्हणजे ‘सचिनमय’ या अल्बममधील सर्वात उठिव आणि आकर्षक गाणे आहे. या अल्बममधील जवळजवळ सर्व गाणी हि लोकगीताला अनुसरून आहेत. यामध्ये शेतकरी गीत, कोळीगीत, पेंद्याने सखा श्रीकृष्ण यासाठी गायलेलं बोबडा गीत आणि धनगर राजा गीत ‘सचिनमय’ अल्बमचा जीव आहेत.
‘सचिनमय हा अल्बम लोकगीतांचा वारसा जपताना दिसतोय. तसेच या अल्बममधील वसंत बापट, दादा कोंडके, गो. नि. दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं. त्यामुळे हि गाणी आजही आणि अजूनही तितकीच जिवंत आहेत. या गाण्यांचं रुपडं बदललं तरीही मूळ तेच राहणार आहे. शेवटी लोकसंगीत आपल्या महाराष्ट्राची शान आहे. या अल्बम मधील गो. नि. दांडेकर लिखित ‘धनगर राजा’ हे गाणं आता नव्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होताना पाहून हे गाणे फक्त ऑडिओ स्वरूपात असताना सागरिका म्युझिकने हे गाणं ऍनिमेटेड व्हिडिओ स्वरूपात आणले आहे. या गाण्याला आतापर्यंत ४५०० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
Discussion about this post