हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय रॅपर सिंगर यो यो हनी सिंग याने अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये ४ ते ५ अज्ञातांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. गेल्या २७ मार्च २०२२ रोजी साऊथ दिल्ली क्लबमध्ये हनी सिंगच्या कार्यक्रमात या अज्ञात व्यक्तींनी गोंधळ घातला होता आणि धक्काबुक्कीदेखील केली होती असा आरोप आहे. शिवाय हनी सिंगच्या या तक्रारीनुसार या अज्ञातांनी धमकीदेखील दिल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केली आहे.
रॅपर हनी सिंग आणि त्याचा वकील इशान मुखर्जी यांनी संबंधित व्यक्तींवर गैरवर्तणूक करणे, धमकी देणे आणि उच्छाद मांडणे असे आरोप केले आहेत. गेल्या महिन्यात २८ तारखेला हि तक्रार दाखल करण्यात आली होती. ही घटना २७ मार्च २०२२ रोजी साउथ एक्स्टेंशन- २ मधील स्कॉल क्लबमध्ये घडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात अली आहे. हनी सिंग आणि त्याचा वकील ईशान मुखर्जी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नोंदविलेल्या एफआयआरमध्ये उल्लेख केल्यानुसार, हनी सिंग हा २६ आणि २७ मार्च २०२२ रोजी मध्यरात्री क्लबमध्ये परफॉर्म करत होता. यावेळी ४ ते ५ अज्ञात व्यक्तींच्या एका गटाने मंचावर जाऊन गोंधळ घातला. परफॉर्मन्सदरम्यान हा सगळा गोंधळ झाल्याने हनी सिंगसह इतर सर्व कलाकारांना स्टेज सोडून तिथून जावं लागलं, असंही यात म्हटलं आहे.
पोलिसांनी FIR मध्ये हनी सिंगचा जबाब नमूद केल्यानुसार तो म्हणाला आहे कि, हनी सिंगच्या चालू परफॉर्मन्स दरम्यान एकूण ४ ते ५ अज्ञात लोकांनी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि शोमध्ये व्यत्यय आणला. त्यांनी जमलेल्या लोकांच्या गर्दीकडे दारूची बाटली दाखवत कलाकारांना स्टेजवरून खाली ढकलून धक्काबुक्की केली. त्यानंतर चेक्स शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने माझा (हनी सिंग) हात पकडला आणि थेट मला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. मी त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो व्यक्ती मला सातत्याने धमक्या देत होता. त्याच्याकडे शस्त्र असल्याचेही मी पहिले होते. तसेच लाल शर्ट घातलेला आणखी एक व्यक्ती व्हिडिओ शूट करत होता आणि ‘भगा दिया हनी सिंह को’ असं म्हणत होता. या जबाबानुसार, स्वेच्छेने इतरांना त्रास देणे, धमकी देणे यांसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post