हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून मराठी सिनेइंडस्ट्रीनेयशाची उंच उंच शिखरे गाठली आहेत. याचे कारण म्हणजे दर्जेदार कथा, अव्वल अभिनय, कमालीचे छायांकन, लयबद्ध संगीत आणि मुख्य म्हणजे शीर्षक व शीर्षकाला साजेसे पोस्टर्स. या प्रत्येक गोष्टीमुळे प्रेक्षक आपोआपच खेचला जात आहे. तसाच आणखी एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होऊ घातला आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘तराफा’. अलीकडेच या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर चांगलेच चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या मी महिन्याच्या ६ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे पोस्टर अतिशय मोहक आहे. एखादे निसर्ग चित्र रेखाटावे असे हे पोस्टर आणि त्यात लक्ष वेधून घेणारे ते दोघं. या पोस्टरवरील तरुण आणि तरुणीची रोमँटिक जोडी आणि मावळतीला जाणारा सूर्य त्यासह घरट्याकडे परतणारी पाखरं असं हे पोस्टर आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट प्रेमकहाणी असेल असे वाटत आहे. निर्माते अविनाश कुडचे (काका) यांनी भूमि प्रोडक्शन या बॅनरखाली ‘तराफा’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अश्विनी कासार, पंकज खामकर, दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे हे कलाकार मुख्य आणि महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील.
‘तराफा’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन सुबोध पवार यांनी केले आहे. एकावेळी विविध जबरदऱ्या यशस्वीरीत्या पेलून सुबोध पवार यांनी एक उत्तम कलाकृती सादर करण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर सुधीर मेश्राम यांनी मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूमिका निभावली आहे. यासह महेश जी. भारंबे यांनी कार्यकारी निर्माता आणि डिओपी राजा फडतरे यांनी सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांचे आहे. तर संगीत विजय गटलेवार आणि कोरिओग्राफी प्रदीप कार्लेकर- शार्दुल कुंवर यांची आहे.
Discussion about this post