हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विदर्भातील लोकप्रिय झाडीपट्टी नाटकाच्या खास शैलीतील दमदार चित्रपट ‘झॉलीवूड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत बऱ्याच आंतरराष्ट्रीय महोत्सवात या चित्रपटाला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हा चित्रपट दिग्दर्शक तृषांत इंगळे यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘झॉलीवूड’ चित्रपट येत्या ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील खुशखुशीत भाष्य शैली हि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. नुकताच याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे आणि शाश्वत सिंग यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अमित मसूरकर आणि डयुक्स `फार्मिंग फिल्म्स’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तर न्यूटन, शेरनी, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले दिग्दर्शक अमित मसूरकर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत. दिग्दर्शक तृषांत इंगळे दिग्दर्शित ‘झॉलीवूड’ हा चित्रपट येत्या ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.
विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी अनेक लोकांना माहीतच नाही. त्यामुळे झाडीपट्टी हा रंगभूमीचा एक भाग असूनही अनोळखीच आहे. त्यामुळे झॉलीवूडमधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपट स्वरुपात जगभर पोहोचणार आहे. “चित्रपट तयार असूनही कोरोना प्रादुर्भावामुळे प्रदर्शित करता येत नव्हता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. ‘झॉलीवूड’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे झाडीपट्टी हा माझ्या हृदयाच्या जवळचा विषय आहे. या विषयाला चित्रपटातून न्याय देऊ शकलो याचं समाधान वाटतं”, असं तृषांत यांनी सांगितलं.
Discussion about this post