हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वसंत कानेटकर लिखित, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे आजतागायत मराठी भाषेत हजारो प्रयोग झाले आहेत. या नाटकाला या नाटकातील प्रत्येक संभाषणाला, स्थितीला मराठी नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी पुरेपूर न्याय दिलाय. यानंतर आता पूर्ण जोमानिशी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हा रायगडावर करण्याचे योजिले आहे. आज दिनांक १८ एप्रिल असून आज ‘वारसा’दिनानिमित्त हा प्रयोग रंगणार आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जागतिक वारसा दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १८ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी या विशेष प्रयोग आणि विशेष कार्यक्रम रायगड किल्ल्यावर आयोजित केलेला आहे.
ते म्हणतात ना, देवाला भेटायचे असेल तर यासाठी देवाचे मुळ अस्तिव असलेल्या जागीच जावे लागते. त्यात रायगड किल्ल्याला भेट देणे म्हणजे देवाच्या अतिशय निकट जाण्यासारखेच आहे. मग अशी संधी सोडू नका. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ आणि मुंबई मराठी साहित्य संघ – नाटयशाखा रंगमंच सहयोगाने नाटयरसिकांना १८ एप्रिल २०२२२ रोजी रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या निमित्ताने सुवर्ण इतिहासाचा एक भाग होता येईल. “इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नाही. तर तो अनुभवायला देखील लागतो. आपला इतिहास आपणच जपायचा असतो”, असे या नाटकाच्या माध्यमातून सादरकर्ते सांगतात.
मुख्य आणि विशेष सांगायचे म्हणजे, मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यशाखा यांच्या वतीने ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी तब्बल ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा प्रयोग विनामूल्य सादर केला जाणार आहे. या नाटकात अभिनेता प्रमोद पवार, यश कदम, उपेंद्र दाते, मोहन साटम, सुभाष भागवत, मा.चिन्मय, मयूर भाटकर, संध्या वेलणकर व अनिता दाते हे कलाकार आपल्या अव्वल अभिनयाने सर्वाना मंत्रमुग्ध करतील. या नाटकाचे दिग्दर्शन उपेंद्र दाते यांनी केले आहे. या नव्या शुभारंभानंतर नाटकाचे महाराष्ट्राभर गोवा, इंदोर असे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत.
Discussion about this post