हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट ‘समरेणू’ मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील मुख्य भूमिका सम्या, रेणू आणि संत्या कोण निभावणार हे प्रेक्षकांसमोर आले होते. तसेच चित्रपटाच्या शीर्षकगीतालादेखील प्रेक्षकांनी पुरेपूर प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये सम्या आणि रेणूची प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान या चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांना आवडत आहेत. या टीझरच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
समरेणू या चित्रपटात महेश डोंगरे, रुचिता मांगडे, भारत लिमन हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश डोंगरे यांनी केले आहे. शिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या टिझरमध्ये समोर येत आहे कि, हा चित्रपट एकमेकांप्रती समर्पित असणाऱ्या सम्या- रेणूची हळूहळू बहरत जाणारी प्रेमकहाणी आहे. तर या चित्रपटामध्ये नायक – नायिकेसोबत खलनायक देखील रंगात आणणार आहे. बदल्याची आग मनात भरलेला संत्या सम्या आणि रेणूच्या प्रेमावर कसा घाला घालतो आणि यातून ते कसे तरतात हे पाहण्यासाठी १३ मी रोजी चित्रपटगृहात समरेणू पहा.
‘समरेणू’ चित्रपटाचे दिग्दर्शक महेश डोंगरे यांनी चित्रपटाविषयी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, ‘समरेणू’ हा चित्रपट माझा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे माझ्यासोबत संपूर्ण टीमला या चित्रपटाची नक्कीच उत्सुकता आहे. सम्या आणि रेणू यांच्या प्रेमकहाणीत वेगळाच ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटातील संगीत टीम खूप अनुभवी आणि कसलेली आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटासोबतच गाणी सुद्धा आवडतील.” सूरज- धीरज यांचे संगीत, गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द तर कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभलेले धमाकेदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे.
Discussion about this post