चंदेरी दुनिया । कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात. तिच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. या वयातही मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.
//www.instagram.com/embed.js
तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. मंदिरा ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल. फोटोत ती स्विमिंग करत करताना पाहायला मिळत आहे. स्विमसूटमध्ये मंदिराचा अंदाज पाहून सारेच तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटस करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
//www.instagram.com/embed.js
तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणा-या मंदिराने नवीन वर्षात काही तरी वेगळं करण्याचं ठरवलंय.मात्र त्यासाठी तिच्या फॅन्सना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.