हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय असा रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉल मराठीची ख्याती निर्माण झाली आहे. हिंदी कलाविश्वात आजवर या शोच्या हिंदी व्हर्जनने अनेकांच्या मनावर राज्य केले. मात्र पहिल्यांदाच हा शो मराठीत येणार असल्यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली होती. यानंतर हा शो सुरु झाला आणि बघता बघता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. इतकेच काय तर मराठी इंडियन आयडॉलला त्यांचा पहिला महाविजेता देखील सापडला आहे. नुकताच या शो चा महाअंतिम सोहळा पार पडला आणि पनवेलचा इंजिनिअर सागर म्हात्रे विजयी झाला. सर्वत्र सोशल मीडियावर सागरची चर्चा सुरु आहे. नेटकरी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
मराठी इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले अतिशय जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात सागर म्हात्रे हा पहिला वहिला मराठी इंडियन आयडॉल ठरला आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ अशी हटके टॅगलाईन असलेल्या या रिऍलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून विविध कानाकोपऱ्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे पहिले पर्व असूनही लोकांनी दिलेला प्रतिसाद हा मंत्रमुग्ध करणारा होता. शिवाय स्पर्धेत सहभागी स्पर्धक इतके अव्वल होते कि प्रेक्षकांसाठी यातून एकाची निवड करणे कठीण होते. पण अखेर.. असली हिरे कीं पहचान जोहरी को होती है हेच खरं! लोकांनी विजेता म्हणून पनवेलच्या सागर म्हात्रेची निवड केली आणि इंडियन आयडॉल मराठीला त्याचा पहिला स्वर मिळाला.
इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता सागर म्हात्रे हा पेशाने इंजिनियर आहे. त्याचा गोड आवाज हीच त्याची ओळख आहे. गेल्या आठवड्यात त्याच्या सादरीकरणाला परीक्षकांकडून झिंगाट परफॉर्मन्स मिळाला. अगदी पहिल्या परफॉर्मन्स पासून सागरने लय कायम ठेवली होती. सागरला बाइक्स मॉडिफाय करण्याची अत्यंत आवड आहे. तो पेशाने इंजिनियर असला तरीही त्याचे संगीतावरील प्रेम त्याला संगीताशी जोडून ठेवते. यामुळे तो नेहमीच तासनतास रियाज करण्यावर भर देतो. याचा परिणाम म्हणजे इंडियन आयडॉलच्या पहिल्या ट्रॉफीवर सागर म्हात्रेचं नाव कोरलं गेलं.
Discussion about this post