हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच आपले आवडते कलाकार तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करत असल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अगदी शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनाही चाहत्यांची नाराजी सहन करावी लागली. दरम्यान प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने चाहत्यांना मनवण्याचा किंवा आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु चाहत्यांच्या अक्कीने मात्र थेट निर्णय घेतला आहे. हा निर्णय ऐकून त्याचे चाहते आनंदी झाले असून लाडक्या अक्कीचे कौतुकही करीत आहेत. अक्षय कुमार याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या जाहिराती परत करणार नाही असे जाहीर केले आहे.
— Akshay Kumar (@akshaykumar) April 20, 2022
अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांची माफी मागताना सोशल मीडियावर एक पोस्ट केलीआहे. ज्यामध्ये त्याने या जाहिरातीमधून स्वत:ला मागे घेत पुन्हा तंबाकूजन्य पदार्थांच्या उत्पादनाची (विमल ब्रांड) जाहीरात करणार नाही, तसेच या उत्पादनांचा ब्रँड अँबॅसडर होणार नाही अशी ग्वाही दिली आहे. अक्षय कुमारने हि पोस्ट आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘मला माफ करा. माझे हितचिंतक आणि चाहते या सर्वांची मी सर्वांची माफी मागू इच्छितो. पाठिमागील काही दिवसांपासून माझ्याबद्दल आलेल्या प्रतिक्रियांनी मला विचार करण्यास भाग पाडले.
पुढे लिहिले कि, ‘मी कधीही तंबाकुजन्य पदार्थांचे सेवन केले नाही. करणार नाही. विमल इलायचीसोबत असलेल्या माझ्या असोसिएशनवरुन काही गोष्टी पुढे आल्या. आपल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे विनम्रतापूर्व मी स्वत:ला या जाहिरातींपासून वेगळे करतोय. मी निर्णय घेतला आहे की, या जाहिरातीतून आलेले पैसे मी एखाद्या चांगल्या कामासाठी वापरेन. ब्रँडला वाटल्यास ते कराराचा अवधी पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध करु शकतात. मात्र मी वचन देतो की, भविष्यात कधीही मी मोठ्या विचारानिशी पर्याय निवडेन. मी सातत्याने तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मागतच राहीन.’ अशा आशयाची पोस्ट करून अक्षय कुमारने चाहत्यांच्या भावनेचा आदर करीत कामाप्रतीही आपली जबाबदारी दर्शवली आहे. या निर्णयामुळे खिलाडीचे चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.
Discussion about this post