हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भोंगा या शब्दाने विशेष खळबळ निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व स्तरांवर भोंग्याची चर्चा आहे. दरम्यान मनसेची आक्रमक भूमिका पाहता मशिदीवरील भोंगे हटविणार का..? असा एक सामान्य प्रश्न सर्वाना पडला आहे. यातच आता सामाजिक समस्या असणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याच्या हेतूने एका वेगळ्या कथेवर आधारित ‘भोंगा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने आपली प्रतिभा प्रदर्शनाआधीच दाखवली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपटातून आपलं ते खरं करण्याची मानवी वृत्ती ध्वनी प्रदूषणासारख्या समस्यांना दुजोरा देते असे सांगण्यात आले आहे. अशा तापलेल्या राजकीय वातावरणात या चित्रपटाच्या पोस्टरचे मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या हस्ते अनावरण झाले.
https://twitter.com/MumbaiVT/status/1517044549549314048
‘भोंगा’ या चित्रपटाच्या नव्या पोस्टर रिलीजसह आणि नवी रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली. या प्रसंगी बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, ‘हा चित्रपट २०१८ ला तयार झाला आहे. मात्र, कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. तो आम्ही आता करत आहोत. पण आज या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण आम्ही आज करत आहोत.
येत्या ३ मे २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होईल. आम्ही विचार केल्याप्रमाणे, हा चित्रपट एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. काही लोकांचे गैरसमज जरी असले तरी या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच दूर होतील.
’अमेय खोपकर यांनी अधिकृत सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट करीत याबाबत आधीच सूचित केले होते. त्यांनी अगदी मोजक्यामात्र मापक शब्दात थेट इशारा देणारे हे सूचक ट्विट केले होते. ज्यामध्ये खोपकरानी लिहिले होते की, आज सकाळी ११ वाजता.. पत्रकार परिषदेत मोठी घोषणा… मोठ्ठा ‘आवाज’ होणार आहे!
आज सकाळी ११ वाजता
पत्रकार परिषदेत मोठी घोषणा…
मोठ्ठा ‘आवाज’ होणार आहे!— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 21, 2022
‘भोंगा’ या चित्रपटाची कथा अजानवर बोलणारी करणारी आहे. एका कुटुंबातील लहानग्या तान्ह्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर असा आजार असतो. दरम्यान अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होतो. या बाळाला होणारा त्रास सगळे पाहत असतात मात्र तो थांबवण्यासाठी कात प्रयत्न केले जातात हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. ‘भोंगा’ या चित्रपटाची निर्मिती शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. तर यामध्ये अभिनेत्री दिप्ती धोत्रे, अभिनेता कपिल कांबळे, श्रीपाद जोशी,अमोल कागणे, पवन वैद्य, आकाश घरत हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
Discussion about this post