हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि अत्यंत बहुचर्चित ‘भोंगा’ या चित्रपटाची कथा एकंदरच धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय हाताळणारी आहे असे वारंवार सांगितले जात आहे. ‘भोंगा’ चित्रपट याच कारणामुळे सध्या राज्यभर चर्चेत आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 2, 2022
मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संदीप देशपांडे आणि अमोल कांगणे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामण महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. या चित्रपटाचे शो थिएटरमध्ये लावण्यावर मुंबई, पुणे, सातारामधील पोलिसांकडून बंदी घालण्यात येतेय. या विषयी मनसे नेते अमेय खोपकर आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सलग २ ट्विट करत याबद्दल खंत आणि संताप दोन्हीही व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकाराबाबत केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेला आहे, तो भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावणे हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसत? यासह आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, राज्यसरकार हुकूमशहासारखं वागतंय, भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर काम करायला स्वतः गृहखातं सांगतय.’
जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
याशिवाय ‘भोंगा’ चित्रपटाचे निर्माते अमोल लक्ष्मण कांगणे यांनीही खंत व्यक्त केली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘सामाजिक विषय हाताळणाऱ्या कथेला राजकीय स्वरूप देणे हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अशा चित्रपटाचा हा अपमान आहे असं मला वाटतं. मराठी चित्रपटांना थिएटर मिळणे, प्राईम टाईम मिळणं ही सर्वात मोठी बोंब असून मराठी चित्रपटनिर्माता स्वतःचे १००% देऊन चित्रपट निर्मिती करतो. जर सरकारने वा पोलीसांनी महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना सहकार्य नाही केलं तर मराठी माणूस कुठे दाद मागणार? मराठी चित्रपटांना सपोर्ट नाही केलं तर मराठी भाषा टिकेल असे मला वाटते, नाहीतर मराठी चित्रपटाचं मार्केट आणि अस्तित्व बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खाऊन टाकायला वेळ नाही लागणार.’
Discussion about this post