हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हजारो.. लाखो आणि असंख्य लोकांच्या मनावर राज्य करणारा दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांची विशेष अशी ओळख करून देण्याची काही गरजच नाही. कारण आतापर्यंत त्यांनी गाजवलेली कारकीर्द हीच त्यांची ओळख आहे. परफेक्शन आणि नम्रपणा यासाठी त्यांना विशेष ओळखले जाते. माणूस कितीही मोठा असला तरीही त्याचे पाय जमिनीवर असायला हवे याचे उत्तम उदाहरण म्हणजे कमल हासन आणि एव्हढे असूनही जर हा अभिनेता कायदेशीर अडचणीत येत असेल तर असे का..? हे जाणून घेऊ.
मीडिया रिपोर्टनुसार, दाक्षिणात्य सिनेमांचे सुपरस्टार कमल हासन यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम’ येत्या ३ जून २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील पहिले गाणे अलीकडेच प्रदर्शित झाले. ज्याचे शीर्षक ‘पत्थला पत्थाला’ असे आहे. मुख्य म्हणजे या गाण्यामुळे कमल हासन कायदेशीर अडचणीत आले आहेत. होय. कमल हासन यांनी स्वतः हे गाणे लिहिले आणि गायलेदेखील आहे. या गाण्याला अनिरुद्ध रविचंदरननं यांनी संगीत दिले आहे.
तर बातमी अशी कि, कमल हासन यांच्या ‘पत्थला पत्था’ला’ गाण्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने असा दावा केला आहे की, ‘पत्थला, पत्थाला’ गाण्याचे शब्द हे केंद्र सरकारची खिल्ली उडवणारे आहेत. यामुळे लोकांमध्ये फूट पडेल’.
या कारणामुळे कमल हासन यांच्या विरोधात चेन्नई पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत चित्रपटाच्या निर्मात्यांना गाण्यातील काही शब्द काढून टाकण्यासाठी सांगण्यात आले आहे. ‘पत्थला पत्थाला’ गाण्याच्या ओळी काहीशा अशा आहेत,”गज्जनाले कासिले कल्लालैयुम कासिले कैचल जोरम नेरैया वरुधु थिल्ललंगाडी थिल्लाले ओन्ड्रियातिन थापले ओन्नियुम इल्ला इप्पले सावी इपो थिरुदन कैला थिल्लंगाडी थिल्लाले…” या शब्दांना सामाजिक कार्यकर्ता सेल्वमने गाण्यातून काढून टाकण्यास सांगितले आहे. सेल्वमने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्याचादेखील निर्णय घेतला आहे.
Discussion about this post