हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मालिका क्षेत्रातील अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपमानकारक पोस्ट लिहिली आहे. यासाठी राज्यातून विविध ठिकाणी तिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी कारवाई करीत तिला अटक केली होती आणि रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने तिला १८ मे २०२२ पर्यंत कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी सर्वत्र केतकीवर संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियापासून सर्व स्तरांवर केतकीवर ट्रोलिंग सुरु आहे आणि अशातच भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई या केतकीची पाठराखण करताना दिसत आहेत. त्यामुळे आता केतकीसह तृप्ती देसाई देखील ट्रोल होत आहेत.
तृप्ती देसाई यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले कि, “आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तिने पोस्ट मध्ये लिहिलेल्या “पवार” या शब्दाने ते नक्की शरद पवारांविषयीच लिहिले आहे का? कारण व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिलेले दिसत नाही. पवार साहेबांविषयी असे त्यांनी जाणून बुजून लिहिले असेल तर चुकीचेच आहे पण केतकी चितळेने जी पोस्ट केली आहे ती चुकीची वाटणाऱ्यांनी तिच्यावर कायदेशीर तक्रारी कराव्यात, तिच्याविषयी चुकीचे शब्द वापरून किंवा तिच्याविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपल्याला संस्कार नाहीत हे दाखवू नये.” या पोस्टनंतर तृप्ती देसाई भयंकर ट्रोल झाल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले कि, ताई तुमच्याकडून तरी काय अपेक्षा करणार..? तर अन्य एकाने लिहिले, काय ताई …एवढा पण बालिश नसावं माणसांनी. याशिवाय आणखी एकाने लिहिले कि, ताई… सोज्वळ पणा बास झ्हाला… खरं तर तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं.. तिने लाज सोडली तर मग बाकीचे बोलणारच…. आणि तुम्ही योग्य भूमिका घ्या उगाच ह्याला त्याला खुश करू नका… बाकी समजून घ्या. अशाप्रकारे तृप्ती देसाईंवरही नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. असे असताना त्यांनाही प्रत्युत्तर द्यायला तृप्ती देसाई मागे हटल्या नाहीत. तर थेट रोखठोक उत्तर देत दुसरी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना ‘ब्राम्हण’ या जातीवरुन ट्रोल केलं आहे. यावर तृप्ती यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
‘मी ब्राह्मण आहे म्हणून केतकी चितळेबद्दल बोलले, अशा ट्रोल करणाऱ्यांना सांगायचं आहे की मी ब्राम्हण नाहीच. पण ज्या 96 कुळी मराठ्यांच्या घरातुन येते तिथे मला सर्वधर्मसमभावाचे आणि परखड मत मांडण्याचे संस्कार दिले आहेत.” अशी पोस्ट करत नेटकऱ्यांच्या आरोपावर तृप्ती यांनी पलटवार केला आहे. यानंतरही ट्रोलिंग एकदम जोरदार सुरु आहे.
Discussion about this post