हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल अपमानकारक आणि आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाई करत ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती. यानंतर तिच्या सुटकेबाबत आज कोर्टात सुनावणी होती आणि या दरम्यान न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे केतकीच्या अडचणी आणि कोठडीतील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे.
फेसबुकवर पोस्ट करताना कोणत्याही शब्दांचे भान न राखता केलेल्या पोस्टमुळे केतकी चांगलीच अडचणीत सापडली आहे. याआधी तिला जेव्हा न्यायालयात हजर केले होते तेव्हा तिला तिची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. दरम्यान ती आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे बोलली होती शिवाय मी माझी पोस्ट हातावणार नाही. मला बोलायचं व्यक्त व्हायचा हक्क आहे अशी तिने भूमिका घेतली होती. यामुळे न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज तिची अटकेतून बाहेर येण्याची शक्यता असताना न्यायालयाने कडक भूमिका घेत तिला न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास चालू आहे.
दरम्यान ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी कारवाई करताना त्यांनी केतकीच्या घरातून तिचा लॅपटॉप आणि ३ मोबाईल जप्त केले आहेत. याशिवाय तिला हि पोस्ट करण्यासाठी कोणती बळजबरी किंवा कुणाचे समर्थन आहे का यासाठीचीही चौकशी सुरु आहे. मात्र केतकीने मी स्वतःहून पोस्ट शेअर केल्याचे कोर्टात म्हटले आहे. केतकीने सोशल मीडिया फेसबुकवर हि पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये शरद पवारांविषयी अतिशय आक्षेपार्ह विधानांचा वापर केला होता. मात्र या पोस्टमध्ये शेवटी ऍडव्होकेट नितीन भावे या नावाचा उल्लेख आहे. तिने यामध्ये लिहिले होते कि,
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
– ऍडव्होकेट नितीन भावे तिच्या या पोस्टवर अजूनही नेटकरी रोष व्यक्त करीत असून हि पोस्ट चांगलीच व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post