हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता वैभव तत्त्ववादी कुल आणि हँडसम अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव आहे. पण गेल्या बऱ्याच दिवसांपासून वैभव गायब झाला होता. यानंतर आता नरेन कुमार यांच्या ‘निर्मल पाठक की घरवापसी’ या वेबसीरिजमधून अभिनेता वैभव तत्ववादी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हि बातमी समजताच वैभवच्या चाहत्यांमध्ये आनंदाचीच वातावरण आहे. या सीरिजचं लेखन राहुल पांडे यांनी केलं आहे. तर दिग्दर्शन राहुल पांडे व सतिश नायर यांनी केलंय. या सिरीजमध्ये वैभव तत्त्ववादीसोबत अल्का आमिन, विनीत कुमार, पंकज झा, आकाश मखिजा, कुमार सौरभ, गरिमा श्रीवास्तव आणि इशिता गांगुली या कलाकाराच्याही अन्य मुख्य भूमिका आहेत.
‘निर्मल पाठक की घरवापसी’ हि वेब सिरीज वैभव साठी थोडी आउट ऑफ द बॉक्स आहे. पण नवीन काहीतरी करण्यातच वेगळी मजा असते जी वैभव अनुभवतोय. या वेब सीरिजचे कथानक बिहारमधील छोट्या गावापासून सुरु होते. यात हृदयस्पर्शी भावना आहेत आणि प्रेक्षकांना वास्तवाची भेट करून देणारी कथा आहे. यामध्ये वैभवने निर्मल पाठक या तरुणाची भूमिका साकारली आहे. हा तरुण तब्बल २४ वर्षांनंतर त्याच्या मूळगावी परतला आहे. हि कथा त्याची आहे आणि त्याच्या प्रवासाची आहे. वैभव मूळ स्वभावाप्रमाणेच यात निर्मल साकारताना दिसतोय. म्हणजे अगदी लाजाळू व संकुचित वृत्तीचा निर्माण आहे. सोनी लिव्हवरील ही सीरिज एक स्पेशल ड्रामा आहे.
आगामी वेब सिरीज ‘निर्मल पाठक की घरवापसी’च्या संकल्पनेबाबत व्यक्त होताना एका मुलाखतीत वैभव तत्त्ववादी म्हणाला कि, “ही सीरिज आपल्या समाजाबाबत बरंच काही सांगून जाते आणि मला या सीरिजचा भाग होण्याचा आनंद होत आहे. ही आपले मूळ शोधणा-या मुलाची कथा आहे. सीरिजच्या नावाशी संलग्न भूमिकेचे नाव असण्याची भावना नेहमीच खूप खास असते. मी खऱ्या आयुष्यातही निर्मल पाठकसारखाच आहे. पटकथा वाचल्यानंतर मला समजलं की, तो माझ्यासारखाच लाजाळू आहे. तो कमी बोलणारा आहे आणि याच गोष्टीशी मी सहजरित्या संलग्न होऊ शकतो.” ही सीरिज येत्या २७ मे २०२२ पासून सोनी लिव्हवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Discussion about this post