हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत कौतुक करावे असे अनेक कलाकार आहेत. यांपैकी एक सालस, सुंदर आणि तितकीच बिंधास्त, बेधडक अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. दिनांक २९ मे रोजी मृण्मयीचा ३४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. नाविन्यपूर्ण भूमिकेतून कायमच प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मृण्मयीचा चाहता वर्ग फार मोठा आहे.
यामुळे तिच्या खाजगी आयुष्यासह नवनवीन प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना विशेष रस असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालन करीत असलेल्या एका शोवर टीकांची आणि ट्रोलिंगची झोड उठली होती. दरम्यान तिने फक्त एकाच वाक्यात ट्रोलर्सची बोलती फुल्ल बंद केली होती. तर आज आपण अशाच बोल बिंदास्त अभिनेत्री मृण्मयी देशपांडेविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
https://www.instagram.com/reel/CeIKTNXqwHW/?utm_source=ig_web_copy_link
मृण्मयीची ती साकारत असलेल्या भूमिकेवर नेहमीच उत्तम पकड राहिली आहे. तिचा अभिनयच तिच्या यशाचा एकमेव मार्ग आहे. तिने प्रत्येक भूमिका जीव ओवीतून साकारल्यामुळे तिच्या जवळजवळ सगळ्याच भूमिका सगळ्यांच्याच लक्षात राहिल्या आहेत. अगदी झी मराठीवरील ‘कुंकू’ या मालिकेतील तिची भूमिका आणि यानंतर अग्निहोत्र ते आता सारेगमपसाठी सूत्रसंचालक अशा प्रत्येक भूमिकेत ती लक्षात राहिली आहे. मृण्मयीने फक्त मालिका नव्हे तर नाटक आणि चित्रपटात क्षेत्रातही अव्वल कामगिरी बजावली आहे. यात ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटसम्राट’, ‘शेर शिवराज’ आणि आता ‘चंद्रमुखी’ अशा दर्जेदार कलाकृतींचा समावेश आहे.
मृण्मयी कितीही गुणी कलाकार असली तरी ट्रोलिंग हा प्रकार कलाकारांच्या पाचवीला पूजलेला असतो. यामुळे जेव्हा एखादा कलाकार एखादी भूमिका करतो वा मांडतो तेव्हा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा हे ट्रोलर्स पातळी सोडून टीका करतात. अशावेळी काही कलाकार बिचारे गप्प बसतात पण काही कलाकार अतिशय सडेतोड उत्तर देत बरोबर चपराक लगावतात. अशा शाब्दिक चपराक देणाऱ्यांमध्ये मृण्मयी सुद्धा आहे बरं का..
नुकतंच होऊन गेलेलं झी मराठीवरील सारेगमप लिटल चॅम्पसच्या नव्या पर्वात परीक्षक म्हणून आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे पहिल्या पर्वातील पंचरत्न दिसले. तर मृण्मयी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसली. यावेळी मृण्मयीसह या ५ उस्तादांनाही ट्रोल करण्यात आलं होत. अगदी ‘ओव्हर अॅक्टींग कमी करा हो’, ‘समोर असलेले जज आणि अँकर खूप ओरडतात याला ओव्हर अॅक्टींग म्हणायची का?’ अस लोक म्हणताना दिसले.
यावर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने ट्रोल करणाऱ्यांना असे काही उत्तर दिले होते कि बस्स.. दरम्यान ट्रोलर्सला फटकारताना मृण्मयी देशपांडे म्हणाली होती कि, ‘तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? शांत बसला असतात का, हाताची घडी घालून.’ पुढे म्हणाली कि, ‘आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय’. मृण्मयीचं हे विधान प्रचंड व्हायरल झालं होत. यानंतर ट्रोलर्सने मृण्मयीला ट्रोल करताना १०० वेळा तरी विचार केला असेल. बहुतेकदा मृण्मयी आता ट्रोल होत नाही तर तीच ट्रोलर्सला ट्रोल करताना दिसते.
Discussion about this post