हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट अलीकडेच २७ मे २०२२ रोजी रिलीज झाला आहे. हा एक चित्रपट नसून एक ऐतिहासिक सोहळा आहे आणि हाच सोहळा अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पहायला मिळतेय. यातच एका इतिहास वेड्या प्रेक्षकाने हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक स्पेशल ऑफर ठेवली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पहायचा आणि याच तिकीट दाखवून थेट अर्धा डझन आंबे मोफत घरी घेऊन जाण्याची हि भन्नाट ऑफर आहे. आपला इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे असा मानस ठेवीत गीतांजली सोनसुरकर, तुषार सोनसुरकर यांनी हा उपक्रम राबविला आहे.
शुक्रवार २७ मे २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याच दिवसापासून ही ऑफरदेखील सुरु झाली आहे. आज ३० मे २०२२ पर्यंत हि ऑफर सुरु आहे. यासाठी तुम्ही चित्रपटाचे तिकीट चित्रपट पाहून झाल्यावर राखून ठेवायचे आहे बरं का. पुढे हेच तिकीट दाखवून अर्धा डझन आंबे फुकट एकदम फ्रीमध्ये घरी घेऊन जा. हि ऑफर १०/१ मॉर्डन इमारत, जेबी रोड, कॉटन ग्रीन, मुंबई येथे संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत सुरु आहे. तसेच इन्स्टाग्रामवर देखील त्यांचं fresh__greeny नावाचं अधिकृत अकाऊंट आहे.
आपला इतिहास कोपऱ्याकोपऱ्यात आणि विशेष म्हणजे आजच्या तरुणाईच्या मनावर बिबविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सोनसुरकर यांच्या बागेतील आंबा थेट तुमच्यापर्यंत आणण्यात आला आहे. आपला इतिहास प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे. तसेच स्वराज्यातील प्रत्येक सरसेनापतीचं कतृत्व प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला समजले पाहिजे.. कळले पाहिजे यासाठी सोनसुरकर यांनी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला आहे. आतापर्यंत या ऑफरमध्ये ५० ते ६० लोकांनी अस्सल रत्नागिरी आंब्याची चव चाखली आहे. तुम्हीही उत्सुक असाल तर त्वरा करा.. ऑफर आजपर्यंतच मर्यादित आहे.
Discussion about this post