Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानच्या जीवाला धोका..?; सुरक्षा यंत्रणेत वाढ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 1, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Moosewala_Salman
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या अतिशय धक्कादायक बातमी ठरली. काही हल्लेखोरांनी ३० राउंड फायर करून त्याच्या शरीराची चाळण केली. त्याची हत्या अतिशय भयावह पद्धतीने करण्यात आली. या घटनेनंतर पंजाब सरकारवर अनेक टीकास्त्र पडली. अगदी बॉलिवूड इंडस्ट्रीतूनही या घटनेचा निषेध आणि शोक व्यक्त करण्यात आला. आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे सिद्धूच्या हल्ल्यातील मुख्य आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने या आधी बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे आता यंत्रणा आणखी सक्रिय झाली आहे आणि सलमानच्या सुरक्षेत वाद करण्यात आली आहे.

Punjabi singer Sidhu Moose Wala was shot by unknown people in Mansa district, Punjab. Further details awaited. pic.twitter.com/DiK5s6UCvv

— ANI (@ANI) May 29, 2022

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची रविवारी २९ मे २०२२ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मानसाच्या जवाहर गावाजवळ त्याच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, २० वर्षीय सिद्धू याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत मुसेवालासोबत असलेले आणखी २ जण जखमी आहेत. मुख्य म्हणजे सिद्धू मुसेवालाची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली आहे. यामुळे पंजाब सरकारवर त्याचे कुटुंबीय आणि चाहते रोष व्यक्त करत आहेत. यानंतर सोमवारी सिद्धूच्या मूळ गावी त्याच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.

https://twitter.com/_protagonist1/status/1531522726858330112?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1531522726858330112%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhellobollywood.in%2Fpunjabi-singer-sidhu-moosewalas-last-rites-done-at-his-village%2F

मुसेवालाच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. कारण या संपूर्ण हत्याकांडाचा सूत्रधार तो असल्याची माहिती दिली जात आहे. पण त्याचे नाव समोर आल्यानंतर सलमान खानची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत या गोष्टीची पुष्टी केली आहे. आम्ही सलमानची सुरक्षा वाढवली असून कोणत्याही टोळी वा गुंडांकडून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. सलमानच्या अपार्टमेंटभोवती पोलीस सुरक्षा तैनात केली असून सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. असं या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

#police #custody में इतना confidence कि अभी तो हमने कुछ किया ही नही है, सलमान खान को मारेंगे यहीं जोधपुर में… #sidhumoosewala #SidhuMooseWalaDeath #SidhuMosseWala #LawrenceBishnoi threat to #SalmanKhan pic.twitter.com/ylPqMdgOBX

— Sandeep Kumar (@KSandeepKoli) June 1, 2022

 

 

माहितीनुसार, २०१८ साली गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने तुरुंगात असतानाच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीमागील कारण म्हणजे, सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण. आता गँगस्टर बिश्नोईचा या प्रकरणाशी काय संबंध..? तर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा त्या संबंधित समाजातील आहे. यामुळे सलमानला मारण्याचा त्याचा प्लॅन होता. मुख्य म्हणजे सलमान जेव्हा रेडी चित्रपटाचं शूट करीत होता तेव्हाच त्याच हत्येचं प्लॅनिंग करण्यात आलं होत. पण आवडीचं शस्त्र न मिळाल्यामुळे हा प्लॅन फसला. याप्रकरणी बिश्नोईचा सहकारी राहुल याला २०२० साली अटक करण्यात आली होती. सध्या बिश्नोई तिहार जेलमध्ये असला तरीही त्याची ७०० जणांची गॅंग तो तुरुंगातूनच चालवतोय. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुपारी घेणे आणि पार पाडणे अशा पद्धतीने हि गॅंग काम करते.

Tags: murderSalman KhanSidhu MoosewalatwitterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group