हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून ज्ञानवापी मशीद प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. यावर अनेकांनी मत व्यक्त केले तर अनेकांनी मत व्यक्त करणे टाळले आहे. याचे कारण म्हणजे ज्ञानवापी मशीद प्रकरणामुळे देशात वातावरण तापले आहे. वाराणसी कोर्टाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम अलीकडेच पूर्ण झाले आहे.
Gyanvapi-Shringar Gauri Dispute Case: Petitioners Obtain 1500 Photos & 10 Hours Of Footage Of The Survey#TNDigitalVideos #GyanvapiCase #GyanvapiSurveyTwist #GyanvapiSurvey pic.twitter.com/SzQebBIyED
— TIMES NOW (@TimesNow) May 30, 2022
या सर्वेचे व्हिडीओ ३० मे २०२२ रोजी हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांना सोपवण्यात आले आहेत. पण यातील काही व्हिडीओ लीक झाल्याचा आरोप हिंदू पक्षकारांनी केलाय. या व्हिडीओंमध्ये शिवलिंग, त्रिशूल अशी चिन्हं दिसत आहेत आणि याच संदर्भात अभिनेता अक्षय कुमारने एका मुलाखतीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं आहे.
Gyanvapi Masjid matter | We're preparing the merits for next hearing. Our counters are ready for every point raised by the Muslim side. As far as Deen Mohammad judgement is concerned, I believe that it is not applicable to us because Hindus were not a party to it: Adv Vishnu Jain pic.twitter.com/Mz11dQYzeX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 31, 2022
या तापलेल्या प्रकरणात एकीकडे लोक बोलणं टाळत असताना आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आपलं मत मांडलं आहे. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षय कुमार व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत बोलला आहे.
Bollywood actor Akshay Kumar too has been drawn out into the ongoing debate surrounding the Gyanvapi findings. #GyanvapiRow #AkshayKumar
Read More: https://t.co/78kshzXWuD pic.twitter.com/iQUEr92VVJ
— TIMES NOW (@TimesNow) June 1, 2022
त्याला या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता तो म्हणाला कि, “जो व्हिडीओ समोर आला आहे त्याबाबत सरकार, एएसआय, पुरातत्तव सर्वेक्षण विभाग, न्यायाधीश योग्य ते मत मांडू शकतील. त्यांना याबाबत अधिक माहिती असावी.
मला याबाबत काहीच माहित नाही. ज्या गोष्टीची माझ्याकडे माहिती नसते त्याबाबत बोलणं मी नेहमीच टाळतो. मी हा व्हिडीओ पाहिला आहे. आपल्याला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर फारसं समजणार नाही. पण व्हिडीओ पाहिला की ते शिवलिंग आहे असं दिसतं.”
Uttar Pradesh | We have the video, but the court has asked us not to make it public…Won't disclose it: Hindu women petitioners after hearing in Gyanvapi mosque case at Varanasi court pic.twitter.com/vhnbI6OIQK
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 30, 2022
आधीच संपूर्ण देशात ज्ञानवापी मशीद प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. यानंतर आता लीक झालेल्या या नव्या व्हिडीओजमुले कदाचीत आणखी एखादा नवा वाद निर्माण होऊ शकतो. ज्ञानवापी परिसरात एक नंदी असून त्याच्या समोर ८३ फुटांवर वजूखाना आहे. याच ठिकाणी शिवलिंगसारखी आकृती सापडली आहे. नंदीचं तोंड शिवलिंगच्या दिशेने असते, असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. पण मुस्लिम पक्षकार हे पाण्याचे कारंजे असल्याच्या दाव्यावर ठाम आहेत. यातच आता अक्षयने मांडलेले मत पाहता वादाला वेगळे स्वरूप मिळते का काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post