हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ३१ मे, २०२२ हा संगीत सृष्टीसाठी काळा दिवस ठरला. लता दीदी, बप्पी दा यांच्यानंतर आता लाखो तरुणांना प्रेम करायला शिकवणारी आणि विरहातून बाहेर काढणारी गाणी गाणारा सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ KK अनंतात विलीन झाला आहे. कोलकाता येथील गुरुदास कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केके यांची प्रकृती अचानक ढासळली. यानंतर हॉटेलमध्ये तातडीने नेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
केके यांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. यानंतर आज २ जून,२०२२ रोजी मुंबईतील वर्सोवा स्मशानभूमीत केके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलीवूड मधील अनेक सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली होती. या निरोपाच्या क्षणांनी अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
KK last journey: The ambulance was decorated with flowers#kk #ripkk #Krishnakumarkunath pic.twitter.com/fzCoHZkhJJ
— @zoomtv (@ZoomTV) June 2, 2022
कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्र परिवार आणि हजारो चाहत्यांच्या गर्दीत केके यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार पार पडले. केके यांचा मुलगा नकुल कुन्नथ याने त्यांच्या पार्थिवाचे अंत्य विधी पूर्ण करीत आपल्या वडिलांना साश्रू नयनांनी निरोप दिला.
चाहत्यांनी केकेला अंतिम निरोप देताना ‘केके अमर रहो’ या घोषणाही दिल्या.
या व्यतिरिक्त म्युझिक इंडस्ट्रीतील काही दिग्गज वर्सोवा स्मशान भूमीत दाखल झाले होते. आपल्या लाडक्या मित्राला कायमचं ‘अलविदा’ म्हणायला संगीत सृष्टीतील दिग्गज मंडळी उपस्थित राहिली होती. दरम्यान सगळंच वातावरण भावूक झालं होतं. केके यांच्या अंत्य यात्रेदरम्यान त्यांच्या पत्नीची अवस्था, मुलांचे चेहरे आणि चाहत्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.
कृष्णकुमार कुन्नथ केके यांची लेक तामरा कुन्नथ हिने सोशल मीडियावर वडिलांच्या अंत्य यात्रेची पोस्ट शेअर केली होती. सोबत मिस यु डॅड असे कॅप्शनही दिले होते.
केकेच्या अंत्य दर्शनासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतून राहुल वैद्य, तोही साबरी, कबीर खान, श्रेया घोषाल, सलीम मर्चंट, शिल्पा राव, अभिजित भट्टाचार्य, जावेद अली, फैसल खान, हरिहरन, शंकर महादेवन, हिमांश कोहली, सुदेश भोसले यांसारखे दिग्गज मंडळी उपस्थित होते.
Discussion about this post