हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक असा विजय तो क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. एक अशी लढत जी चुरशीची आणि रंगतदार होती. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील भारताचा ऑस्ट्रेलियावरील विजय हा आधुनिक काळातील एक मोठा उत्सव होता. याच विजयाची गाथा सांगणाऱ्या बंदों में था दम या बहुप्रतीक्षित वेब सिरीजचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. इतकेच नव्हे तर या वेब सिरींजची रिलीज डेट सुद्धा जाहीर झाली आहे. ही वेबसिरीज येत्या १६ जून २०२२ रोजी एम वूट सिलेक्टवर रिलीज होत आहे. या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.
भारतीय क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये हा विक्रमी विजय मिळवला होता. हि मालिका २-१ फरकाने भारताने जिंकली होती. लक्ष्य गाठताना भारताला एकूण ३२८ धावांची आवश्यकता होती आणि शुभमन गिलच्या उत्कृष्ठ खेळीमुळे भारताची आधीच सुरुवात चांगली झालेली. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्याची प्रेरणा आधीच गवसली होती. या सामन्यात एकी दाखवत भारताने विजय मिळवला आणि इतिहास रचला. कारण सलग ३२ वर्षांपासून ब्रिस्बेनच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियाने एकतर्फी वर्चस्व कायम राखलं होतं. याच घटनेवर आधारीत ‘बंद में था दम’ हि आगामी वेब सीरिज असल्याचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी सांगितले.
दिग्दर्शक नीरज पांडे यांनी आगामी वेब सिरीज ‘बंदे में था दम’चा दमदार ट्रेलर आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करीत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे कि, “जेव्हा सर्व काही त्यांच्या विरोधात होते, तेव्हा ते उभे राहिले आणि त्यांनी जगाला त्यांची खरी जिद्द, ताकद आणि दृढनिश्चय दाखवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान लढतीच्या कथेचा साक्षीदार व्हा. कसोटी इतिहासातील भारताच्या सर्वात मोठ्या विजयामागील कथा. बंदों में था दम – भारताच्या अभिमानाची लढाई.”
Discussion about this post