हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। TRP मध्ये सगळ्यात टॉप ला राहायचं म्हणून सगळ्याच वाहिनी धडपडत असतात. पण सगळेच टॉप कसे असतील..? सध्या चुरशीच्या या लढतीत झी मराठी, कलर्स मराठी, सोनी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिनी आघाडीवर आहेत. दरम्यान मराठी मालिकांमध्येही टीआरपीची स्पर्धा जोरदार रंगलेली असते. प्रत्येक आठवड्यात TRP च्या रेसमध्ये कुणी पुढे कुणी मागे होताना दिसत. यावेळी याआधी एक काळ असा होता कि ‘झी मराठी’वरील मालिका नेहमीच टॉप १० मध्ये असायच्या. पण यावेळी झी मराठीला पिछाडून गेल्या अनेक महिन्यांपासून हे स्थान ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकांनी मिळवलं आहे. झी मराठीच्या फक्त २ मालिका टॉप १० मध्ये आहेत. तर अन्य ८ या स्टार प्रवाहाच्या मालिका आहेत. चला तर जाणून घेऊया टॉप १० मालिकांची यादी.. आणि प्रेक्षकांची विशेष पसंती.
TRP TOP 10 मालिकांची यादी
Top 1 : ’रंग माझा वेगळा’
– गेल्या आठवड्यात ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने पहिले स्थान पटकावले होते. यानंतर आता याही आठवड्यात या मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ झाली आहे आणि सलग २१व्या आठवड्यात ‘रंग माझा वेगळा’चा टीआरपी ६.९ आहे. म्हणूनच याहीवेळी टॉप १ च्या स्थानी हि मालिका आहे.
Top 2 : ‘आई कुठे काय करते’
काही दिवसांपूर्वी ‘आई कुठे काय करते’ हि मालिका नेहमीच प्रथम स्थानी दिसली आहे. पण रंग माझा वेगळा मालिकेच्या टीआरपीसमोर या मालिकेचा टीआरपी काही अंशी घसरल्याचे दिसून आले. त्यामुळे ६.७ टीआरपीसह हि मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र सोशल मीडियावर हि मालिका अतिशय लोकप्रिय आहे.
Top 3 : ‘फुलाला सुगंध मातीचा’
‘फुलाला सुगंध मातीचा’ हि मालिका हिंदी मालिका दिया और बातीचा रिमेक असली तरीही मराठीमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील मुख्य नायिका किर्तीच्या आयुष्यात आलेले ट्विस्ट मालिकेच्या पथ्यावर पडत आहेत आणि म्हणून या मालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
Top 4 : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’
सलग २१ व्या आठवड्याच्या टीआरपी लिस्टमध्ये टॉप १० च्या यादीत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका चौथ्या स्थानावर कायम आहे. या मालिकेला ५.८ रेटींसह टीआरपीच्या लिस्ट मध्ये चौथे स्थान मिळाले आहे.
Top 5 : ‘तुझेच मी गीत गात आहे’
‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अगदी काहीच महिन्यांपूर्वीच रीलिज झाली आहे. तरीही या मालिकेला टीआरपीच्या लिस्टमध्ये टॉप १० मध्ये जागा मिळाली आहे हे मालिकेचे अनोखे यश आहे. हि मालिके कुल्फी कुमार बाजेवाला या हिंदी मालिकेचा रिमेक असून यामध्ये उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर अशी स्टाररकास्ट आई. या मालिकेचे टीआरपी रेटिंग ५.० इतके आहे.
Top 6 : ’ठिपक्यांची रांगोळी’
‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील अप्पू आणि शशांक यांची जोडी प्रेक्षकांना भारीच आवडली आहे. त्यांची केमिस्ट्री जितकी लोकप्रिय होत चालली आहे तितका मालिकेचा टीआरपी वाढतोय. तूर्तास ‘ठिपक्यांची रांगोळी’ हि मालिका टीआरपी लिस्टमध्ये सहाव्या स्थानी असून या मालिकेचे टीआरपी रेटिंग ४.९ इतके आहे
Top 7 : ‘माझी तुझी रेशीमगाठ’
‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. या मालिकेमध्ये प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वैकुंठ मुख्य भूमिकेत आहेत. सध्या मालिकेत यश आणि नेहाच्या लग्नबाबत मोठे ट्विस्ट येताना दिसत आहेत. त्यातच लहानश्या परीचा क्यूटनेस आणि तिचा अभिनय हे लोकांना भारी आवडत आहे. त्यामुळेच हि मालिके टीआरपीच्या टॉप १० मध्ये दिसतेय. या मालिकेचे टीआरपी रेटींग ४.३ इतके आहे.
Top 8 : ‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’
‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ हि स्टार प्रवाहवरील मालिका अद्यापही आठव्या स्थानावर कायम आहे. या मालिकेचे टीआरपी रेटिंग ३.८ इतके आहे.
Top 9 : ‘सहकुटुंब सहपरिवार’
’सहकुटुंब सहपरिवार’ हि मालिका एका कुटुंबातील प्रेम, वाद , खटके, माया आणि ऋणानुबंध यांवर आधारित आहे. या मालिकेची लोकप्रियता पाहता मालिकेला टॉप १० मध्ये नववे स्थान मिळाले आहे. या मालिकेचे टीआरपी रेटिंग ३.३ इतके आहे.
Top 10 : ‘मन उडू उडू झालं’
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ हि मालिका अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेतील दिपू म्हणजेच हृता दुर्गुळे आणि इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत यांची केमित्री लोकांना आवड्ताना दिसतेय. त्यामुळे ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका टीआरपीच्या टॉप १० मध्ये दहाव्या स्थानी आहे आणि या मालिकेचे टीआरपी रेटिंग ३.० इतके आहे.
Discussion about this post